सौरव गांगुलीचे बंगाली खेळाडूंच बक्षिसाच्या रक्कमेपासून वंचित; वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

सौरव गांगुली हे स्वतः या अगोदर बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष साहिलेले आहे. आता बीसीसीआय अध्यक्ष या नात्याने भारतीय क्रिकेटसाठी उत्पनाचे मोठे स्त्रोत असलेल्या आयपीएलच्या नियोजनाते ते गुंतलेले आहेत.

कोलकता : गत रणजी मोसमात प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या बंगालचा अंतिम सामन्यात पराभव झाल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, परंतु या उपविजेतेपदाचे बीसीसीआयकडून मिळणारे 1 कोटी रुपयांचे बक्षिस अद्याप त्यांना मिळालेले नाही. बंगालचे माजी खेळाडू आणि भारताचे यशस्वी कर्णधार सौरव गांगुली स्वतः बीसीसीआयचे अध्यक्ष असतानाही बंगाल रणजी संघाच्या खात्यात अजून उपविजेतेपदाची रक्कम जमा झाले नाही.

यंदाच्या दंहीहंडी संदर्भात भाजपनेते राम कदम यांची मोठी घोषणा; वाचा काय म्हणाले ते... 

बंगालमधील टेलिग्राफ या वर्तमानपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. सध्या क्रिकेट बंद असले तरी कालच बंगाल क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी टीम बॉंडिंगचे ऑनलाईन चर्चासत्र झाले त्यात बक्षिसाची ही रक्कम अद्याप न मिळाल्याचा उल्लेख एका वरिष्ठ खेळाडूनेही केला. खेळाडूंची थकबाकी आम्ही पुढील आठवड्यात देऊ असे आश्वासन बंगाल क्रिकेट संघटनेने दिले. सध्याची परिस्थिती आम्हीही जाणतोच, त्यामुळे आम्ही तक्रार करत नाही, परंतु तीन महिने आम्हाला कोणतीच रक्कम मिळालेली नाही, असे एका खेळाडूने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

भूमिगत मेट्रो 3 चे काम झपाट्याने; अनेक स्थानकांच्या छतांचे काम प्रगतीपथाकडे....​

आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत, अंतर्गत लेखापरिक्षण पूर्ण करण्यासाठी ऑफिस कर्मचारी काम करत आहेत. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की एक दोन दिवसात आम्ही बीसीसाआयकडे अहवाल पाठवू, असे आश्वासन बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी दिले. लॉकडाऊनमुळे ऑफिस कर्मचाऱ्यांची संख्याही मर्यादित आहे. तरिही खेळाडू, सपोर्ट स्टाफ सामना अधिकारी, पंच यांचे मानधन आम्ही प्राधान्यक्रमाने पूर्ण करत आहोत असेही अविषेक म्हणाले. 

बीकेसी रुग्णालयाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात! कंत्राटदाराला 40 टक्के अधिक दर दिल्याचा गंभीर आरोप; वाचा बातमी​

सौरव गांगुली हे स्वतः या अगोदर बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष साहिलेले आहे. आता बीसीसीआय अध्यक्ष या नात्याने भारतीय क्रिकेटसाठी उत्पनाचे मोठे स्त्रोत असलेल्या आयपीएलच्या नियोजनाते ते गुंतलेले आहेत. यंदाचा रणजी अंतिम सामना मार्चमध्ये लॉकडाऊन होण्याच्या काही दिवस अगोदर संपला. सामन्याच्या अंतिम दिवसाचा खेळ तर प्रेक्षकांविना झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bangal cricket players still didnt get ranaji price from bcci