BAN Vs ZIM Shakib Al Hasan : कर्णधार शाकिबने 'इथं' सामना फिरवला नसता तर...

Bangladesh vs Zimbabwe Shakib Al Hasan
Bangladesh vs Zimbabwe Shakib Al Hasanesakal

Bangladesh vs Zimbabwe Shakib Al Hasan : बांगलादेशने टी 20 वर्ल्डकप 2022 च्या आजच्या सामन्यात झिम्बाब्वेवर अवघ्या 3 धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. भारत - पाकिस्तान सामन्यात अखेरच्या षटकात नो बॉलवरून रणकंदन माजले होते. आजच्या सामन्यात देखील शेवटच्या चेंडूवर नो बॉल नाट्य रंगले. मात्र हे नाट्य रंगूनही झिम्बाब्वेला बांगलादेशचा विजयी घास हिरावून घेता आला नाही. जरी बांगलादेश - झिम्बाब्वे सामन्यात शेवटचे षटक अत्यंत महत्वाचे असले तरी बांगलादेशसाठी कर्णधार शाकिब - अल - हसनने टाकलेले 19 वे षटक आणि सेन विलियम्सला बाद करणे हा मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला.

Bangladesh vs Zimbabwe Shakib Al Hasan
BAN vs ZIM | VIDEO : माघारी गेलेले संघ परत बोलवले; L1, W, L4, 6, W, N, 0 एकाच षटकात घडलं बरंच

बांगलादेशने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 151 धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर बांगलादेशच्या टस्किनने भेदक मारा करत झिम्बाब्वेची अवस्था 4 बाद 35 अशी केली होती. मात्र झुंजार सेन विलियम्सने 42 चेंडूत 64 धावांची झुंजार खेळी करत सामन्याचे पारडे झिम्बाब्वेच्या बाजूने झुकेवले होते.

दरम्यान, सामन्याचे अत्यंत महत्वाचे षटक 19 वे षटक टाकण्याची जबाबदारी बांगलादेशचा कर्णधार शाकिब - अल - हसनने आपल्या खांद्यावर घेतली. झिम्बाब्वेला 12 चेंडूत विजयासाठी 26 धावांची गरज असताना शाकिबने पहिल्या चेंडूवर एक धाव दिली. त्यानंतर सेट झालेला विलियम्स स्ट्राईकवर आला. त्याने शाकिबच्या दुसऱ्या चेंडूवर 2 आणि तिसऱ्या चेंडूवर 4 धावा वसूल करत पहिल्या तीन चेंडूत 7 धावा केल्या. मात्र पुढच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विलियम्सला शाकिबने अप्रतिम क्षेत्ररक्षण करून धावबाद केले. शाकिबने 19 व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर 3 धावा दिल्या. शाकिबने 19 व्या षटकात विलियम्सची महत्वपूर्ण विकेट घेत फक्त 10 धावा दिल्या.

Bangladesh vs Zimbabwe Shakib Al Hasan
ZIM vs BAN : भारत - पाक थरार विसरा! झिम्बाब्वे बांगलादेश सामन्यातही 'नो बॉल' ठरला दुखरी नस

त्यामुळे शेवटच्या षटकात झिम्बाब्वेला विजयासाठी 16 धावांचे टार्गेट मिळाले. हुसैनने शेवटच्या षटकात दोन विकेट घेत 12 धावा दिल्या. याचदरम्यान, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नो बॉल नाट्य घडले. विकेटकिपर नुरूलने स्टम्पिंग करताना चेंडू विकेटच्या आधी पकडल्यामुळे पंचांनी हा नो बॉल ठरवला. मात्र झिम्बाब्वेला एका चेंडूवर 4 धावांची गरज असतानाही त्याचा फायदा उचलता आला नाही. अखेर बांगलादेशने सामना 3 धावांनी जिंकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com