BCCI announces India squad for WTC final
BCCI announces India squad for WTC final

Team India : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी, पण उपकर्णधाराचं नाव मात्र गुलदस्त्यातच

टीम इंडियाचा नवा उपकर्णधार कोण असावा?

BCCI announces India's squad for WTC final : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना या वर्षी ७ जून रोजी ओव्हल लंडन येथे खेळल्या जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमनेसामने असतील. या मेगा मॅचसाठी बीसीसीआयने मंगळवारी आपल्या संघाची घोषणा केली.

या संघात काही नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. किंवा असेही म्हणता येईल की ज्या जुन्या लोकांना टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. पण सर्वात मोठी प्रश्न पडतो, तो म्हणजे टीम इंडियाचा नवा उपकर्णधार कोण? कारण या सामन्यासाठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे यात उपकर्णधार पद कोणाला दिले नाही.

BCCI announces India squad for WTC final
WTC Team India Squad: 15 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! रहाणे पुन्हा एकदा संघात सुर्या बाहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील कसोटी क्रिकेटमध्ये सतत फ्लॉप ठरणाऱ्या भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुलला डिस्चार्ज देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी त्याच्या जागी उपकर्णधाराची घोषणा केलेली नाही.

आता राहुलला पुन्हा उपकर्णधारपद दिले जाऊ शकत नाही, अशा स्थितीत टीम इंडियात उपकर्णधारपदासाठी कोणाचे पर्याय आहेत? पहिला पर्याय कदाचित चेतेश्वर पुजारा असेल. तो वरिष्ठही आहे आणि यापूर्वी उपकर्णधारही होता. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकली तेव्हा पुजारा उपकर्णधार होता.

BCCI announces India squad for WTC final
Team India Squad : WTC फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा! 'या' खेळाडूंना मिळाली संधी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील 15 जणांच्या संघात अजिंक्य रहाणेचे पुनरागमन झाले आहे. केएस भरतला यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली आहे. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, यष्टिरक्षक इशान किशन आणि कुलदीप यादव यांना संघात संधी मिळालेली नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत हे तिघेही संघाचा भाग होते.

चार वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांना संधी मिळाली आहे. वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघ - रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com