BCCI Chief Selector: चेतन शर्मा होणार कोट्याधीश! समितीचे सदस्य किती घेणार पगार, जाणून घ्या एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI Chief Selector Salary

BCCI Chief Selector: चेतन शर्मा होणार कोट्याधीश! समितीचे सदस्य किती घेणार पगार, जाणून घ्या एका क्लिकवर

BCCI Chief Selector Salary: बीसीसीआयने अधिकृतपणे चेतन शर्मा यांची निवड समितीच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा नियुक्ती केली आहे. चेतन शर्मा यांच्यासह निवड समितीच्या इतर चार सदस्यांचीही नावे जाहीर करण्यात आली. मुख्य चेतन शर्मा यांच्यासह इतर चार सदस्यांचे वार्षिकचा पगार किती आहे.

हेही वाचा: Team India: BCCI नाही तर... राहुल द्रविडच उठलाय रोहित-विराटच्या मुळावर

चेतन शर्मा यांचा हा दुसरा टर्म सुरू झाला आहे. शेवटची टर्म खराब राहिली होती. विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर संघ निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआयने निवड समिती हटवली होती. तत्पूर्वी, पुनर्स्थापित करूनही जुन्या समितीने श्रीलंकेविरुद्धही संघ निवडला होता. मुख्य निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा वार्षिक पगार किती आहे हे माहिती आहोत का. यासह इतर सदस्यांना वर्षभरासाठी किती पगार मिळणार हे जाणून घ्या....

हेही वाचा: Chetan Sharma: काढून टाकलेल्या चेतन शर्मांनी केली जादू! पुन्हा झाले नव्या निवडसमितीचे चेअरमन

BCCI Chief Selector Salary: मुख्य निवडकर्त्याचा पगार

  • चेतन शर्मा : 1 कोटी 25 लाख (वार्षिक)

BCCI Selection Committee 2023: इतर सदस्यांचा पगार

  • शिव सुंदर दास : 1 कोटी रुपये (वार्षिक)

  • सुब्रतो बॅनर्जी : 1 कोटी (वार्षिक)

  • सलील अंकोला : 1 कोटी (वार्षिक)

  • श्रीधरन शरथ : 1 कोटी रुपये (वार्षिक)

हेही वाचा: Rishabh Pant: पंतच्या गुडघ्यावर तब्बल 4 तास चाललेली शस्त्रक्रिया अखेर संपली; मात्र आता...

मागील निवड समितीच्या कार्यकाळात टीम इंडियाला कोणतेही मोठे यश मिळाले नाही. आशिया चषक, दोन टी-20 विश्वचषकातील पराभवाशिवाय इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पराभवाने सर्वांनाच हैराण केले. यादरम्यान निवड समितीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव झाला तेव्हा बीसीसीआयने निवड समिती हटवली होती.