Team India: BCCI नाही तर... राहुल द्रविडच उठलाय रोहित-विराटच्या मुळावर

आता रोहित आणि विराट टी-20 संघात दिसणार नाहीत ?
Rahul Dravid On Rohit Sharma And Virat Kohli
Rahul Dravid On Rohit Sharma And Virat Kohli

Rahul Dravid On Rohit Sharma And Virat Kohli : बीसीसीआयने अद्याप भारतीय क्रिकेटमध्ये बदल घडवण्याच्या योजनांची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. परंतु श्रीलंका मालिका तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान याचे संकेत मिळाले आहेत. खरं तर हार्दिक पांड्या अधिकृतपणे टी-20 कर्णधार असणार आहे, परंतु विराट कोहली, रोहित शर्मा आणि इतर नियमित टी-20 वरिष्ठ खेळाडू दिसणार नाहीत.

Rahul Dravid On Rohit Sharma And Virat Kohli
Rishabh Pant: पंतच्या गुडघ्यावर तब्बल 4 तास चाललेली शस्त्रक्रिया अखेर संपली; मात्र आता...

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संकेत दिले आहेत की रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू टी-20 संघातून बाहेर असू शकतात. मुख्य प्रशिक्षकाच्या म्हणण्यानुसार पुढील टी-20 विश्वचषकासाठी संघ तयार करण्यात येत आहे. 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.

Rahul Dravid On Rohit Sharma And Virat Kohli
Chetan Sharma: काढून टाकलेल्या चेतन शर्मांनी केली जादू! पुन्हा झाले नव्या निवडसमितीचे चेअरमन

पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, टीम इंडिया 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी पुनर्रचना करत आहे. द्रविडच्या मते आमचा संघ खूप प्रतिभावान आहे. त्यामुळे तरुणांनी संयमाने काम करण्याची गरज आहे. मुख्य प्रशिक्षकाकडून मिळालेल्या या संकेतांवरून हे स्पष्ट झाले आहे की, संघ व्यवस्थापन टी-20 इंटरनॅशनलमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या पुढेचा विचार करत नाही.

Rahul Dravid On Rohit Sharma And Virat Kohli
Dasun Shanaka : लंकेचा 'नाबाद' कर्णधार; हार्दिकच्या गोलंदाजांची इथेच झाली हार?

दरम्यान, द्रविडच्या टिप्पण्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी इनसाइडस्पोर्टने बीसीसीआयच्या वतीने निर्णयकर्त्यांशी संपर्क साधला. बैठकीदरम्यान उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, तिन्ही फॉरमॅटमधील वरिष्ठ खेळाडूंना या योजनेबद्दल माहिती देण्यात आली आहे. एकीकडे ऑक्‍टोबरमध्‍ये होणार्‍या एकदिवसीय विश्‍वचषकावर लक्ष केंद्रित केले आहे, तर दुसरीकडे संघ व्‍यवस्‍थापन 2024च्‍या टी-20 विश्‍वचषकासाठी वेगळी तयारी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com