esakal | ऋषभ पंत कोरोना संक्रमित; आणखी एका सदस्याला बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

rishabh pant

ऋषभ पंत कोरोना संक्रमित; आणखी एका सदस्याला बाधा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लंडन : चार ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेआधी इंग्लंडमध्ये टीम इंडियाचे खेळाडू विश्रांती घेत आहेत मात्र, बाहेर फेरफटका मारतानाही दिसत आहेत. याच दरम्यान भारताचा एक खेळाडू कोरोना संक्रमित आढळल्याचं वृत्त आलं होतं.

हेही वाचा: JEE Mains 2021 : जेईईच्या चौथ्या सत्राच्या तारखा ढकलल्या पुढे

याआधी सूत्रांच्या माहितीनुसार, तो खेळाडू ऋषभ पंतच आहे असं सांगितलं जात होतं. पंतला ८ दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. तेव्हापासून तो लंडनमधील त्याच्या एका मित्राच्या घरी होम क्वारंटाइन झाला आहे. १५ जुलैला लंडनहून डुरहॅमला जाणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश नव्हता. तो कोरोनातून पूर्णपणे बरा झाला की मगच डुरहॅमला रवाना होणार आहे. याबाबत आता BCCI ने स्वत: अधिकृत माहिती दिली आहे.

हेही वाचा: दक्षिण अफ्रिकेत दंगल; 'गुप्ता ब्रदर्स' ठरले आणीबाणीला कारणीभूत

BCCIने त्या खेळाडूचे नाव जाहीर केलेले नव्हतं. त्याची पुष्टी आज BCCI ने ट्विट करत म्हटलंय की, दोन मेम्बर्स कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामध्ये विकेट किपर रिषभ पंत याला 8 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यासोबतच ट्रेनिंग असिस्टंट/नेट बॉलर दयानंद गाराणी देखील पॉझिटीव्ह आहे.

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने बॉलिंग कोच बी. अरुण, रिद्धिमान साहा आणि अभिमन्यु ईश्वरन हे गारानी यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनाही विलगीकरणात ठेवले आहे. हे चार कर्मचारी 10-दिवस अलिप्त राहतील आणि लंडनमधील टीम हॉटेलमध्ये त्यांच्या संबंधित खोल्यांमध्ये राहतील, असं BCCI ने म्हटलंय.

loading image