esakal | IPL च्या 2 नव्या टीमसाठी मेगा लिलाव; तारीखही ठरली?
sakal

बोलून बातमी शोधा

ipl

IPL च्या 2 नव्या टीमसाठी मेगा लिलाव; तारीखही ठरली?

sakal_logo
By
सुशांत जाधव

क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा ठरलेल्या आयपीएल स्पर्धेत आणखी रंगत येणार आहे. 2022 च्या हंगामात दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी होतील. दोन संघाच्या समावेशासाठी बीसीसीआयची तयारी पूर्ण झाली असून दोन नव्या टीमसाठी होणाऱ्या मेगा लिलावाची तारीखही पक्की झाल्याचे समोर येत आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, 17 आक्टोबर रोजी आयपीएलमध्ये सहभागी करण्यात येणाऱ्या नव्या संघासाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या दोन टीममुळे बीसीसीआयला जवळपास 5000 ते 6000 कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचेही बोलले जात आहे. 2008 पासून बीसीसीआयच्या अंतर्गत रंगणाऱ्या स्पर्धेत सध्याच्या घडीला 8 संघाचा सहभाग आहे. यात दोन संघांची भर पडणार आहे. नव्या संघाच्या समावेशसाठी आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने 31 ऑगस्ट रोजी निविदा काढली होती.

हेही वाचा: जुन्या फोटोवरून गंभीर-युवराजमध्ये ट्विटरवर रंगला मजेशीर संवाद

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या वृत्तानुसार, लिलावात सहभागी होण्यासाठी कोणत्याही कंपनीला 10 लाख रुपये खर्च करावे लागतील. बोलीच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी भरलेली ही रक्कम नापरतावा स्वरुपाची असेल. सुरुवातीला नव्या टीमची मूळ किंमत 1700 कोटी होती. यात वाढ करण्यात आली असून टीमची मूळ किंमत 2000 कोटी इतकी करण्यात आली आहे.

हेही वाचा: VIDEO : पाकिस्तानच्या महिला बॉलरमुळे शेन वॉर्न पुन्हा चर्चेत

लिलावासंदर्भातील काही खास गोष्टी

# वर्षाला 3000 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपन्याच या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.

# जर 2-3 कंपन्या मिळून एक टीम खरेदी करणार असतील तर त्यातील एका कंपनीची उलाढाल ही 2500 कोटींच्या घरात असण्याची अटही घालण्यात आली आहेय

# टीमची मूळ किंमत

आयपीएलमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या टीमची किंमत 2000 कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

#या तीन संघाचा होऊ शकतो समावेश

अहमदाबाद, लखनऊ आणि पुण्याच्या आधारावर दोन संघांची एन्ट्री होऊ शकते. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमसह लखनऊच्या इकाना स्टेडियमवर प्रेक्षक क्षमता अधिक आहे. त्यामुळे या दोन स्थळांना फ्रेंचाइजीची अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे.

loading image
go to top