esakal | जुन्या फोटोवरून गंभीर-युवराजमध्ये ट्विटरवर रंगला मजेशीर संवाद
sakal

बोलून बातमी शोधा

Yuvraj-Gambhir

गंभीरने फोटो पोस्ट करत लिहीलं मजेदार कॅप्शन, युवीनेही दिलं उत्तर

जुन्या फोटोवरून गंभीर-युवराजमध्ये ट्विटरवर रंगला मजेशीर संवाद

sakal_logo
By
विराज भागवत

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम डावखुऱ्या फलंजदाजांच्या यादीत दोन नावं नक्कीच घेतली जातात. ते दोन खेळाडू म्हणजे माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि सिक्सर किंग युवराज सिंग. गौतम गंभीरने २००७ आणि २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दमदार खेळी करून आपली कायमस्वरूपी छाप सोडली. तर युवराज सिंगने विश्वचषकाच्या सामन्यात सहा चेंडूत सहा षटकार लगावत भारतीयांची मान कायमची उंचावली. हे दोन खेळाडू संघातील खेळाडूंशी जरी धमाल मस्ती करत वागत असले, तरी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंसमोर ते खूप आक्रमक असायचे. गौतम गंभीरने त्याचा एक जुना फोटो पोस्ट केला. त्यावरूनच गंभीर आणि युवराज यांच्यात मजेशीर संवाद रंगला.

हेही वाचा: IPL 2021: "विराटच्या RCB ला जर स्पर्धा जिंकायची असेल तर..."

गौतम गंभीरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. एका कसोटी सामन्यातील तो फोटो होता. या फोटोत गौतम गंभीर आणि युवराज सिंग मैदानावर धमाल करताना दिसत आहेत. मैदानावर गौतमी गंभीरचा शर्ट युवराज सिंग मागच्या बाजूने ओढताना दिसत आहे. आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य आहे. हा फोटो पोस्ट करून त्याला गौतम गंभीरने कॅप्शन दिले आहे की आपल्या दोघांच्या चेहऱ्यावर हास्य आहे हे बरं झालं. नाहीतर लोकांना वाटलं असतं की मी कोणाशीही भांडणं करायलाच चाललो आहे. त्यावर युवराजने मजेशीर रिप्लाय दिला. आपण खेळत असताना मला नेहमी तुला असंच मागे खेचून भांडणांपासून दूर ठेवावं लागत होतं, अशी कमेंट युवराजने केली. युवराजच्या या कमेंटलादेखील भरपूर लाईक्स मिळाले.

हेही वाचा: IPL 2021 : इंग्लिश खेळाडूंना मोजावी लागेल मोठी किंमत

गंभीरचा विराटला सल्ला

विराट कोहलीने कित्येक दिवसांपासून कसोटी क्रिकेट खेळलं आहे. तशातच त्याचा फॉर्म फारसा चांगला नाही. त्यामुळे कसोटी ते टी२० अशी फलंदाजीची विचारसरणी आत्मसात करण्याचे आव्हान विराटपुढे असणार आहे. तसेच, एबी डिव्हिलियर्ससाठीही आव्हान असणार आहे. एबी डिव्हिलियर्सने मधल्या काळात कोणतीही क्रिकेट स्पर्धा खेळलेली नाही. त्यामुळे त्याला पटकन खेळ आत्मसात करावा लागेल आणि चांगली कामगिरी करावी लागेल. बंगळुरू संघाची मदार या दोन खेळाडूंवर आहे. त्यामुळे RCBला IPL जिंकायचं असेल, तर या दोघांना दमदार खेळ करावाच लागेल", असा सल्ला गौतम गंभीरने दिला.

loading image
go to top