BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BCCI announces a major salary hike for women cricketers : जाणून घ्या, आधी किती रुपये मिळायचे आणि आता किती मिळणार?
Indian women cricketers celebrate as BCCI announces a major salary hike, doubling player pay to strengthen women’s cricket in India.

Indian women cricketers celebrate as BCCI announces a major salary hike, doubling player pay to strengthen women’s cricket in India.

BCCI

Updated on

BCCI women cricketers salary hike : नवीन वर्षाच्या आधी बीसीसीआयने देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंना एक खास भेट दिली आहे. नुकत्याच झालेल्या एपेक्स काउन्सिलच्या बैठकीत बीसीसीआयने देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंच्या सामन्याच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खेळाडूंचे वेतन आता दुप्पट झाले आहे. 

 महिला क्रिकेटच्या हितासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे. काही दिवसांआधीच भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून एकदिवसीय विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. तेव्हापासून महिला खेळांडून विशेष लक्ष दिले जात असल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत, महिला क्रिकेटपटूंना देशांतर्गत सामन्यांसाठी फार कमी मॅच फी मिळत होती. सिनियर महिला टुर्नामेंटमध्ये  प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंना दररोज २० हजार रुपये मिळत होते. तर राखीव खेळाडूंना १० हजार मिळत असे. तर ज्युनियर संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंना दररोज १० हजार  रुपये मिळत असे आणि राखीव खेळाडूंना पाच हजार रुपये मिळायचे. तर टी-२० स्पर्धांमध्ये, ही रक्कम आणखी कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन  बीसीसीआयने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Indian women cricketers celebrate as BCCI announces a major salary hike, doubling player pay to strengthen women’s cricket in India.
Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

नवीन वेतन रचनेनुसार सिनियर महिला टुर्नामेंटमध्ये  प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंना दररोज ५० हजार आणि राखीव खेळाडूंना २५ हजार मिळतील. याशिवाय, टीँ20 सामन्यांसाठीही वेतन वाढवण्यात आले आहे. प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंना २५ हजार आणि राखीव खेळाडूंना १२ हजार ५०० रुपये मिळतील. तर, ज्युनियर स्पर्धांमध्ये प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंना २५ हजार आणि राखीव खेळाडूंना १२ हजार ५०० रुपये  मिळतील. परिणामी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या महिला खेळाडूंचे वेतन दुप्पट झाले आहे.

Indian women cricketers celebrate as BCCI announces a major salary hike, doubling player pay to strengthen women’s cricket in India.
ICC T20 Rankings : भारताचा 'T-20' मधील दबदबा कायम! ; 'ICC Ranking'मध्ये 'टीम इंडिया'च अव्वल

तर याशिवाय, या नवीन शुल्क रचनेचा फायदा पंच आणि देशांतर्गत क्रिकेटमधील सामनाधिकारी यांच्यासह सामनाधिकारींनाही होईल. देशांतर्गत स्पर्धांमध्ये लीग सामन्यांसाठी, पंच आणि सामनाधिकारी यांना प्रतिदिन ४० हजार रुपये मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com