..म्हणून Mumbai Indians ला पराभवाचा सामना करावा लागतोय

BCCI
BCCIesakal
Summary

टी-20 क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलाय.

टी-20 क्रिकेट विश्वचषक (T20 Cricket World Cup) सुरू होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलाय. त्यातच आता आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची व्यस्तता पाहता भारतीय क्रिकेट मंडळानं (Indian Cricket Board) सर्व फ्रँचायझींना पत्र लिहिलंय. बीसीसीआयनं (BCCI) पत्राव्दारे फ्रँचायझीला विनंती केलीय, की टी-20 विश्वचषक पाहता विश्वचषक संघातातील समाविष्ट खेळाडूंना काही सामन्यांमध्ये विश्रांती द्यावी. या विनंतीला मान देत मुंबई इंडियन्सनं रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांना 19 सप्टेंबरच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यातून वगळलं होतं. वृत्तानुसार, बीसीसीआयनं मुंबई इंडियन्स आणि इतर फ्रँचायझींना टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समाविष्ट खेळाडूंची विशेष काळजी घेण्याची विनंती केली होती.

कोणतीही जोखीम घ्यायची नाही

प्रसारमाध्यमांशी बोलताना क्रिकेट बोर्डाचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, रोहित शर्मा हा विश्वचषकात संघाचा एक महत्त्वाचा भाग असेल आणि आम्हाला त्याच्याबद्दल कोणतीही जोखीम घ्यायची नाही आणि याच कारणामुळं मुंबई इंडियन्सनं त्याला पहिल्या सामन्यात विश्रांती दिली. आम्ही रोहित आणि मुंबई इंडियन्सला स्पष्ट सांगितलंय, की आधी वर्ल्ड कपला प्राधान्य द्यावं आणि त्या अनुषंगानं आम्हाला तसा Result मिळतोय.

हार्दिकला दोन सामन्यात विश्रांती

बीसीसीआयनं आयपीएल फ्रँचायझीला लिहिलेल्या पत्राचा परिणाम स्पष्ट दिसतोय. मुंबई इंडियन्सनं पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्यांच्या अष्टपैलू हार्दिक पांड्याला विश्रांती दिली. त्यामुळे दोन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं. मुंबई इंडियन्सचे गोलंदाज प्रशिक्षक शेन बॉन्डनं सांगितलं, की टी -20 विश्वचषकामुळे हार्दिकला संघात समाविष्ट केलं जात नाही, असं त्यानं स्पष्ट केलं.

BCCI
कर्करोगाला हरवून मैदानावर जबरदस्त पुनरागमन

भारतीय संघाच्या गरजा पहाव्या लागतील

मुंबई इंडियन्सचा गोलंदाज प्रशिक्षक शेन बॉन्ड म्हणाला, आम्हाला भारतीय संघाच्या गरजा पहाव्या लागतील आणि त्यानुसार जुळवून घ्यावं लागेल. ही फ्रँचायझी आपल्या खेळाडूंची खूप काळजी घेते. आम्हाला फक्त आयपीएल जिंकण्याची नाही, तर टी -20 विश्वचषकासाठी खेळाडूंना तंदुरुस्त ठेवायचंय आणि आशा आहे, की हार्दिक पुढील सामन्यातून पुनरागमन करेल. मुंबई इंडियन्सच्या सहा खेळाडूंची भारताच्या टी-20 विश्वचषक संघात निवड झालीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com