इंग्लंडच्या गड्यांना झालाय तरी काय? बेन स्टोक्सही IPL मधून आउट

Ben Stoke
Ben Stoke

इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार जो रुटनंतर आता बेन स्टोक्सनं (Ben Stokes) ही आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. अति क्रिकेटमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी त्याने व्यावसायिक क्रिकेटपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतलाय. भारतात इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेसंदर्भात फ्रेंचायझी संघ नव्या संघ बाधणीच्या तयारीत असताना इंग्लंडमध्ये वेगळेच वारे वाहू लागले आहेत. रुट पाठोपाठ बेन स्टोक्सही आयपीएलपासून दूर राहणार आहे.

ब्रिटिश प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, घरच्या मैदानातील हंगामासाठी सज्ज राहण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंनी (England Cricketer) मोठी भूमिका घेतली आहे. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत बेन स्टोक्सला (Ben Stokes) नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले होते. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने केवळ 236 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत त्याच्या हाती केवळ चार विकेट्स लागल्या. इंग्लंडला या मालिकेत 0-4 अशा लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Ben Stoke
AFC चॅम्पियन्स लीगमध्ये दिगज्ज संघांविरुद्ध खेळणार 'आमची मुंबई'

इंग्लंडच्या खराब कामगिरीनंतर खेळाडूंवर जोरदार टीका होत आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार डेविड गावर यांच्यासह अन्य दिग्गजांनी इंग्लंडच्या कसोटीतील फ्लॉपशोला टी-20 लीग स्पर्धा कारणीभूत असल्याचे म्हटले होते. 'लंडन इव्हिनिंग स्टँडर्ड'च्या वृत्तानुसार, स्टोक्स यंदाच्या वर्षी आयपीएलपासून दूर राहणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवे संघ मैदानात उतरणार असून स्पर्धा आणखी रंगतदार करण्याचा बीसीसीआयचा प्लॅन आहे. यासाठी होणाऱ्या मेगा लिलावाची उत्सुकताही आता शिगेला पोहचली आहे.त्यात इंग्लंडच्या खेळाडूंनी स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण होत आहे.

Ben Stoke
हिटमॅन फिटनेसची अपडेट्स आली; कधी उतरणार मैदानात?

बेन स्टोक्ससंदर्भात स्थानिक प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, स्टोक्स मागील काही वर्षांपासून संघर्ष करत आहे. त्याचे वडिलांची 13 महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्याने मानसिक आरोग्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटपासून ब्रेक घेतला. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने आयपीएलच्या गत हंगामातून माघार घेतली होती. तो दुसऱ्या टप्प्यात खेळताना दिसला नव्हता. आयपीएलपासून दूर झाल्याने स्टोक्सला मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. मात्र देशाच्या क्रिकेटसाठी त्याचा हा निर्णय फायदेशीर ठरेल, असा उल्लेख वृत्तामध्ये करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com