AFC चॅम्पियन्स लीगमध्ये दिगज्ज संघांविरुद्ध खेळणार 'आमची मुंबई'

या स्पर्धेत भाग घेणारा मुंबई सिटी हा दुसरा भारतीय क्लब ठरला आहे.
mumbai city fc
mumbai city fcSakal
Summary

जयेश सावंत

मुंबई : आयएसएल (ISL) विजेत्या मुंबई सिटी एफसीला (Mumbai City FC) आशियातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली असून, या स्पर्धेत भाग घेणारा मुंबई सिटी हा दुसरा भारतीय क्लब ठरला. ते ISL 2020-21 लीग विजेते शिल्ड जिंकून 2022 AFC Champions League साठी पात्र ठरले आणि ते पश्चिम विभागातून स्पर्धा करतील.

सोमवारी क्वालालंपूर येथे झालेल्या 2022 AFC चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या (AFC Champions League) अधिकृत ड्रॉमध्ये Mumbai City FC ला गट टप्प्यातील 'गट ब' मध्ये ठेवण्यात आले आहे. युएईचा अल जझीरा, सौदी अरेबियाचा अल-शबाब आणि इराकचा एअर फोर्स क्लब यांच्यासोबत मुंबई सिटी (Mumbai City FC) दोन हात करणार आहे. “आता आम्हाला आमच्या प्रतिस्पर्ध्यांची ओळख झाली असून यापुढे आमचे उद्दिष्ट आयएसएल मागोमाग एएफसी चॅम्पियन्स लीगमध्येही यशस्वी होण्याचे असेल. जेव्हा आम्ही चॅम्पियन्स लीगमध्ये पोहोचू, तेव्हा आम्हाला खात्री करायची आहे की आम्ही मुंबईचे चांगले प्रतिनिधित्व करू आणि आशियाई मंचावर भारतीय फुटबॉलचे एक वेगळे रूप दाखवून देऊ,” असे संघाचे मुख्य प्रशिक्षक डेस बकिंगहॅम म्हणाले.

मुंबई सिटीने 2020-21 मध्ये लीग टेबलमध्ये 20 सामन्यांमध्ये 40 गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले, या 20 सामन्यांपैकी ते 12 जिंकले, 4 ड्रॉ आणि 4 सामने गमावले. स्पॅनिश प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली, संघाने एक रोमांचक आणि प्रभावी खेळाचे प्रदर्शन करत सर्वाधिक 35 गोल ठोकण्याची किमया केली.

mumbai city fc
हिटमॅन फिटनेसची अपडेट्स आली; कधी उतरणार मैदानात?

या ड्रॉमध्ये एकूण 40 संघ सहभागी होते. त्यामधून प्रत्येकी चार संघांच्या 10 गटात वर्गवारी करण्यात आली, पाच गट (A-E) पश्चिम विभागातील आणि पाच गट (F-J) पूर्व विभागामध्ये अशे दोन विभाग पाडण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई सिटी एफसीच्या सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणे योग्य वेळी जाहीर केली जातील. असे AFC ने जाहीर केलेल्या निवेदनात सांगितले.

mumbai city fc
लोणावळा ते वेस्ट इंडीज; U19 India तील पठ्ठ्याचा संघर्षमयी प्रवास

या आठवड्याच्या सुरुवातीला AFC ने प्रसिद्ध केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, पश्चिम विभागातील 2022 AFC चॅम्पियन्स लीग गट टप्पे 7 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान सुरू होतील आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सामने एकाच ठिकाणी खेळवले जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com