Ben Stokes
esakal
इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. २०२५ च्या मेगा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याने २०२७ च्या आयपीएल लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं आहे. विशेष म्हणजे, त्याने या लिलावासाठी २ कोटी रुपये ही सर्वाधिक मूळ किंमत (बेस प्राइस) निश्चित केली आहे.
आयपीएलने मंगळवारी सर्व फ्रँचायझींना खेळाडूंची प्राथमिक यादी पाठवली. या यादीत स्टोक्ससह एकूण ३० खेळाडूंनी २ कोटी रुपयांची बेस प्राइस ठेवली आहे. हा लिलाव १६ डिसेंबरला गोव्यात होणार आहे.