'स्विंगमास्टर' भुवीने रचला मोठा इतिहास; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज | bhuvneshwar kumar becomes 1st player to take most wickets in 1st over of t20i matches | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhuvneshwar kumar

'स्विंगमास्टर' भुवीने रचला मोठा इतिहास; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची ओळख क्रिकेट जगतात भारताचा 'स्विंगमास्टर' म्हणून आहे. या स्विंगमास्टरने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात मोठ इतिहास रचला आहे. भुवनेश्वर कुमार आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.( bhuvneshwar kumar becomes 1st player to take most wickets in 1st over of t20i match)

भुवनेश्वर कुमारने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत पहिल्याच षटकात 14 बळी घेतले आहेत. या फॉरमॅटमध्ये कोणत्याही गोलंदाजाने त्याच्यापेक्षा जास्त विकेट घेतलेल्या नाहीत. बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडच्या सलामीवीराला बाद करताच भुवनेश्वर कुमार पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.

हेही वाचा: Eng Vs Ind: शतकवीर दीपक हुडा सोडून फ्लॉप विराट कोहलीला संधी; अन् फक्त एक...

भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पहिल्या षटकात 14 बळी घेतले आहेत, तर डेव्हिड विलीने 13, अँजेलो मॅथ्यूजने 11, टीम साऊथीने 9 आणि डेल स्टेनने 9 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय भारताकडून भुवीनंतर आर अश्विनने (4 विकेट) पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेतले आहेत.

तसेच, भुवनेश्वर आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारतासाठी सर्वाधिक वेळा सामनावीर बनलेला वेगावन गोलंदाज बनला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक वेळा सामनावीर ठरेल्या वेगवान गोलंदाजाचा विचार केला, तर दिग्गज कपिल देवच्या नावावर हा विक्रम आहे. तर एकदिवसीय क्रिकेमध्येही ही कामगिरी कपिल देवच्याच नावावर आहे.

हेही वाचा: MS Dhoni: एमएस धोनीने इंग्लंडमध्ये घेतली भारतीय खेळाडूंची भेट

सर्वाधिक वेळा सामनावीर ठरलेला भारताचे वेगवान गोलंदाज

कसोटी क्रिकेट – कपिल देव (८ वेळा)

एकदिवसीय क्रिकेट – कपिल देव (११ वेळा)

टी-२० क्रिकेट – भुवनेश्वर कुमार (४ वेळा)

Web Title: Bhuvneshwar Kumar Becomes 1st Player To Take Most Wickets In 1st Over Of T20i Matches

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..