Bhuvneshwar Kumar T20 World Cup 2022
Bhuvneshwar Kumar T20 World Cup 2022esakal

Bhuvneshwar Kumar : 12 चेंडू 0 धावा 1 विकेट! भुवीचा नेदरलँडविरूद्ध वेगळाच तोरा

Bhuvneshwar Kumar T20 World Cup 2022 : भारताने नेदरलँडचा 56 धावांनी पराभव करत टी 20 वर्ल्डकपमधील सुपर 12 मधला आपला सलग दुसरा विजय साजरा केला. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 2 बाद 179 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात खेळणताना नेदरलँडला 20 षटकात 9 बाद 123 धावांपर्यंतच मजल मारता आली. सामन्याचा मानकरी म्हणून 25 चेंडूत नाबाद 51 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली. मात्र या सर्व घडामोडीत भुवनेश्वर कुमारचा पहिला स्पेल देखील सर्वांचे लक्ष वेधून गेला.

Bhuvneshwar Kumar T20 World Cup 2022
IND vs NED : रोहित शर्मा स्वतःवरच नाराज; म्हणाला मी अन् विराटनं चर्चा...

भारताने विराट कोहली नाबाद 62 धावा, रोहित शर्मा 53 धावा आणि सूर्यकुमार यादवच्या आक्रमक 51 धावांच्या जोरावर नेदरलँडसमोर विजयासाठी 180 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या नेदरलँडला पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमरच्या भेदक माऱ्याचा सामना करावा लागला. पहिल्या षटकात भुवनेश्वर कुमारने एकही धाव न देता नेदरलँडच्या फलंदाजांना चांगलेच दमवले. मात्र अर्शदीपने पुढच्याच षटकात दोन चौकारांसह 11 धावा दिल्या.

परंतु आज भलत्याच लयीत असलेल्या भुवनेश्वर कुमारने पुन्हा सामन्यातील तिसरे आणि स्वतःचे दुसरे षटक निर्धाव टाकले. याचबरोबर विक्रमजीस सिंगचा त्रिफळा उडवत भारताला पहिले यश देखील मिळून दिले. भारताकडून टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामन्यात दोन षटके निर्धाव टाकणारा भुवनेश्वर कुमार एकटा नाहीये. यापूर्वी हरभजन सिंगने 2012 ला इंग्लंडविरूद्ध दोन निर्धाव षटके टाकली होती. जसप्रीत बुमराहने 2016 मध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात दोन निर्धाव षटके टाकली होती. तर भुवनेश्वर कुमारने हा कारनामा दोनवेळा केला आहे. 2016 ला संयुक्त अरब अमिरातीविरूद्ध आणि आता टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये नेदरलँडविरूद्ध दोन षटके निर्धाव टाकली.

Bhuvneshwar Kumar T20 World Cup 2022
King Of Fifties: भारताच्या 'या' खेळाडूच्या नावावर सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम

भुवनेश्वर कुमारने आजच्या सामन्यात आपला 4 षटकांचा कोटा देखील पूर्ण केला नाही. त्याने आपले वैयक्तिक तिसरे आणि सामन्याचे 17 वे षटक टाकले. त्यात त्याने 1 विकेट आणि 9 धावा दिल्या. भुवनेश्वरची सामन्यातील गोलंदाजीची फिगर ही 3 षटके 2 निर्धान षटके 9 धावा आणि 2 विकेट अशी राहिली.

भारताकडून आर. अश्विन, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी देखील प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीने देखील 1 विकेट घेत या सर्वांना चांगली साथ दिली. नेदरलँडकडून टिम प्रिंगलने सर्वाधिक 20 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com