मेलबर्न स्टार्सला डाव सुरु करण्यापूर्वीच का मिळाल्या ५ धावा?

Big Bash League : मेलबर्न स्टार्सला डाव सुरु करण्यापूर्वीच का मिळाल्या ५ धावा?
Big Bash League Melbourne Stars
Big Bash League Melbourne Starsesakal

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बीग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेत आज ( दि. २४ ) हॉबर्ट हरिकेन्स (Hobart Hurricanes) आणि मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) यांच्यातील सामन्यात एक अजब प्रकार घडला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हॉबर्ट हेरिकेन्सने २० षटकात ६ बाद १८० धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात मेलबर्न स्टार्सचे सलामीवीर मार्कस स्टॉयनिस आणि जो क्लार्क मैदानात उतरले. मात्र या दोघांनी डावाची सुरुवात करण्यापूर्वीच मेलबर्नच्या स्टार्सच्या धावफलकावर ५ धावांची नोंद झाली होती.

Big Bash League Melbourne Stars
कुलदीपची प्रशंसा अश्विनला टोचली याचा मला आनंदच : शास्त्री

बीग बॅश लीगमधील (Big Bash League) आजच्या सामन्यात हॉबर्ट हरिकेन्सने (Hobart Hurricanes) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हॉबर्टचे सलामीवीर बेन मॅकडेरमोट ( Ben McDermott) आणि कर्णधार मॅथ्यू वेडने (Matthew Wade) धडाकेबाज सुरुवात करत ९३ धावांची सलामी दिली. बेनने ६७ तर मॅथ्यू वेडने ३९ धावांची खेळी केली. मात्र त्यानंतर आलेल्या फलंदाजांना फारशी चमक दाखता आली नाही.

दहाव्या षटकात ९३ धावांपर्यंत मजल मारणाऱ्या हॉबर्टला मेलबर्न स्टार्सने १८० धावात रोखले. हॉबर्टचे सहा फलंदाज बाद झाले. दरम्यान, शेवटच्या काही षटकात टीम डेव्हिडने (Tim David) १२ चेंडूत २२ धावांची आक्रमक खेळी केली. यात त्याने १ षटकार आणि १ चौकार मारले. मात्र याच टीम डेव्हिडने २० व्या षटकात एक मोठी चूक केली. त्यामुळे मेलबर्न स्टार्सला (Melbourne Stars) ५ धावा बोनस मिळाल्या.

Big Bash League Melbourne Stars
व्हेगन कर्णधार 'बिर्याणी' निवडणार नाही का : जाफरचा सवाल

२० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर टीम डेव्हिडने (Tim David) एक शॉर्ट धाव घेतली. त्यामुळे हॉबर्ट हरिकेन्सला ५ धावांचा दंड झाला. त्यामुळे मेलबर्न स्टार्सच्या डावाची सुरुवात थेट बिनबाद ५ धावांपासूनच झाली. दरम्यान, मेलबर्न स्टार्सने हॉबर्ट हरिकेन्सच्या १८० धावांचा पाठलाग करताना १३ षटकात ३ बाद ११० धावांपर्यंत मजल मारली होती. स्टार्सकडून सलामीवीर जो क्लार्कने ४० चेंडूत ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com