नेमारने दिले वादाला आमंत्रण; 500 पाहुणे आणि लाँग वीक न्यू इअर पार्टीमुळे येणार अडचणीत

neymar
neymar

ब्राझिलिया - ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार नव्या वादात अडकला आहे. ब्राझीलमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार नेमारने कोरोना व्हायरसचा धोका असतानाही न्यू इयरच्या आधी मोठ्या पार्टीचं आयोजन केलं आहे. एका पत्रकाराने दावा केला की, नेमारने आठवडाभर चालणाऱ्या या पार्टीमध्ये 500 लोकांना बोलावलं आहे. रिओ दि जेनेरिओच्या जवळ असलेल्या लक्झरी बीचसाइड व्हीलामध्ये ही पार्टी सुरू आहे. शनिवारी सुरु झालेली ही पार्टी न्यू इअरपर्यंत चालणार आहे. 

जगात सर्वाधिक कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीत ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये 1 लाख 91 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 7.4 मिलियन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या पार्ट्यांमुळे वादात राहणाऱ्या नेमारने शेजाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून साउंडप्रूफ उपकरणे लावली आहेत. 

नेमारच्या या पार्टीमध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांचे मोबाइल फोन दारातच जमा करून घेण्यात आले होते. सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे पुरावे मिळू नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आली असल्याचं समजतं. पण नेमारच्या प्रतिनिधींनी ही अफवा असल्याचं म्हटलं आहे. नेमारच्यावतीने सांगण्यात आलं की, अशा प्रकारची कोणती पार्टी झालेली नाही. तर दुसऱ्या बाजूला एका इव्हेंट एजन्सीने कोस्टा वर्डेमध्ये न्यू इअर इव्हेंटचे आयोजन झाले असल्याचं म्हटलं आहे. त्याचठिकाणी नेमारचा व्हीला आहे. 

नेमारा व्हीला मंगरातिबा इथं आहे. हा रिओ दि जेनेरिओमधील बीचसाइडला आहे. स्थानिक टाउन हॉलने त्यांच्या 41 हजार नागरिकांना वर्षाच्या शेवटी पार्टी आयोजित न करण्याचं आवाहन केलं आहे. लोकांच्या एकत्र येण्यावर रोखण्यासाठी अडथळे निर्माण केले आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने नेमारच्या पार्टीबाबत कोणती माहिती नसल्याचे म्हटले आहे. 

नेमारचा व्हीला हा 10 हजार वर्ग मीटर जागेत असून त्यामध्ये एक हेलिपोर्ट, स्पोर्ट पीच, स्पा, मसाज पार्लर, जीमसह अनेक सोयी सुविधा आहेत. दुखापतीतून सावरण्यासाठी आणि आराम करण्यासाठी नेमार याठिकाणीच सर्वाधिक वेळ घालवतो. मार्च ते जून दरम्यान, फ्रान्समध्ये कोरोनामुळे फुटबॉलसह अनेक खेळांवर बंदी होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com