Brazil FIFA World Cup : ब्राझीलला धक्का! नेमारनंतर आता अजून दोन खेळाडूंना दुखापत, वर्ल्डकपमधून पडले बाहेर

Brazil FIFA World Cup 2022 Injury
Brazil FIFA World Cup 2022 Injuryesakal

Brazil FIFA World Cup 2022 Injury : फिफा वर्ल्डकपच्या साखळी फेरीतच ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारच्या घोट्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे नेमार पुढच्या काही सामन्यांना मुकला. ब्राझील नेमारच्या दुखापतीच्या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच त्यांना अजून दोन धक्के बसले. ब्राझीलचे फुटबॉलपटू गॅब्रियल जिजस आणि अॅलेक्स टेल्लेस हे गुडघ्याच्या दुखापतीमुळे इथून पुढचा संपूर्ण वर्ल्डकप सामन्यांना मुकले आहेत. शुक्रवारी कॅमेरूनने ब्राझीलचा 1 - 0 असा पराभव केला होता. या सामन्यातच गॅब्रिअल आणि अॅलेक्सला दुखापत झाली.

Brazil FIFA World Cup 2022 Injury
Pele Health Update : द ग्रेट पेले यांची प्रकृती खालावली; उपचारांना देत आहेत कमी प्रतिसाद

आज शनिवारी सकाळी गॅब्रिअल आणि अॅलेक्सच्या गुडघ्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये या दोघांच्या गुडघ्याला झालेली दुखापत गंभीर असल्याेच दिसून आले. ही दुखापत उरलेल्या वर्ल्डकप सामन्यापूर्वी बरी होणारी नाही. ब्राझीलने राऊंड ऑफ 16 या बाद फेरीत प्रवेश केला आहे. त्यांचा सामना सोमवारी दक्षिण कोरियासोबत होणार आहे. टेल्लास सारखा बचावपटू दुखापतग्रस्त होऊन वर्ल्डकपला मुकल्याने ब्राझीलला बचाव फळीत समस्या जाणवू शकते.

Brazil FIFA World Cup 2022 Injury
FIFA World Cup 2022 : इंग्लंडला बरोबरीत रोखणाऱ्या अमेरिकेचे पॅकअप; नेदरलँडने गाठली क्वार्टर फायनल

अर्सेनालकडून खेळणारा फॉरवर्ड गॅब्रिअल हा ब्राझीलकडून ग्रुप स्टेजच्या तीनही सामन्यात खेळला होता. मात्र ब्राझीलकडे आघाडीच्या फळीत खेळणाऱ्या खेळाडूंची कमतरता नाही. त्यामुळे गॅब्रिअलच्या दुखापतीचा ब्राझीलच्या पुढच्या फळीला फारसा फटका बसणार नाही. दरम्यान, ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे यांनी नेमार हा कतारमधील वर्ल्डकपमध्ये खेळणार असल्याचे सांगितले होते. नेमारला यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिल्याच सर्बिया विरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती.

नेमार लुसैल स्टेडियमवर आपल्या संघ सहकाऱ्यांसोबत दिसला होता. त्यामुळे दक्षिण कोरियाविरूद्धच्या सामन्यात नेमार खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com