Vinod Kambli : कांबळीला मराठमोळ्या उद्योजकाने दिलेल्या नोकरीच्या ऑफरचं पुढं काय झालं?

Businessmen Sandeep Thorat Job Offer What Is Cricketer Vinod Kambli Reaction
Businessmen Sandeep Thorat Job Offer What Is Cricketer Vinod Kambli Reaction esakal

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची घरची परिस्थिती बेताचीच होती. मात्र विनोद कांबळीने (Vinod Kambli) जिद्दीने क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द घडवत भारतीय संघात स्थान मिळवले. मात्र गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे. कोरोना काळानंतर त्याच्या हातात काम नाहीये. सचिनबरोबरच आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दिला सुरूवात करणाऱ्या विनोद कांबळीची जीवनशैली कायम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

मात्र आता त्याची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची झाली आहे. बीसीसीआयकडून माजी खेळाडू म्हणून त्याला महिन्याला 30 हजार रूपये पेन्शन मिळते. सध्या त्याचा उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत हा पेन्शनच आहे. याबाबत त्याने काम (Job) देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे आवाहन केले होते. मात्र एमसीएसच्या आधी एका मराठमोळ्या उद्योजकाने विनोद कांबळीच्या आवाहनला प्रतिसाद दिला होता.

Businessmen Sandeep Thorat Job Offer What Is Cricketer Vinod Kambli Reaction
Asia Cup 2022 : भारत - पाकिस्तान लढतीत कोणाचं आहे पारडं जड?

विनोद कांबळीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो मुश्किलीने आपले कुटुंब चावलत आहे. मला नोकरीची गरज आहे. विनोदने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे नोकरीची मागणी केली होती. दरम्यान, विनोद कांबळीला नोकरीची गरज आहे असं ऐकल्यानतंर लगेचच संदीप थोरात (Businessmen Sandeep Thorat) यांनी त्याला आपल्या कंपनीत 1 लाख रूपये पगाराच्या नोकरीची ऑफर दिली. मात्र ही नोकरी क्रिकेटशी संबंधित नव्हती. कांबळीला मुंबईमधील सह्याद्री उद्योग समुहात वित्त विभागात नोकरी देण्याची ऑफर थोरात यांनी दिली आहे.

Businessmen Sandeep Thorat Job Offer What Is Cricketer Vinod Kambli Reaction
Asia Cup 2022 : रवी शास्त्रींनी Ind vs Pak सामन्याच्या टायमिंगवर केली टीका

दरम्यान, विनोद कांबळीने लहानपणापासून फक्त क्रिकेटच खेळलं आहे. विनोद कांबळीने थोरात यांच्या नोकरीच्या ऑफरवर अजून कोणतेही उत्तर दिलेले नाही. शालेय क्रिकेटपासूनच तो प्रसिद्धीच्या झोतात होता. त्याने कसोटीत भारताकडून सर्वात वेगाने 1 हजार धावा करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. त्याने सर डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षा फक्त एक डाव जास्त खेळून कसोटीत 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com