Indian Wells 2024: अल्कारेजकडून सिनरची सलग 19 विजयांची मालिका खंडीत, आता मेदवेदेवशी फायनलमध्ये करणार दोन हात

Carlos Alcaraz vs Jannik Sinner: इंडियन वेल्स ओपन टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कारेजने सिनरची सलग 19 विजयांची मालिका खंडीत करत फायनलमध्ये प्रवेश केला.
Carlos Alcaraz - Jannik Sinner
Carlos Alcaraz - Jannik SinnerX/ATP

Indian Wells 2024: इंडियन वेल्स ओपन ही टेनिस स्पर्धा सध्या चालू असून शनिवारी (16 मार्च) झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात 20 वर्षीय अल्कारेजने इटलीच्या यानिक सिनरला पराभवाचा धक्का दिला. यासह स्पेनचा अल्कारेज अंतिम सामन्यात पोहचला आहे.

उपांत्य सामन्यात अल्कारेजने पहिला सेट अत्यंत वाईटरित्या पराभूत झाल्यानंतरही दणक्यात पुनरागमन केले आणि पुढील दोन्ही सेट जिंकून अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला. अल्कारेजने 1-6, 6-3, 6-2 अशा फरकाने सिनरला पराभूत केले.

यासह सिनरची सलग 19 विजयांची मालिका खंडीत झाली. त्याचबरोबर 2024 वर्षात सलग 16 विजयांनंतर सिनर पराभूत झाला आहे. सिनरने 2024 ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपदही जानेवारीमध्ये जिंकले होते.

Carlos Alcaraz - Jannik Sinner
Indian Wells 2024: लाईव्ह सामन्यात अचानक मधमाशांचा हल्ला, खेळाडूंना कोर्टमधून काढावा लागला पळ; Video व्हायरल

दरम्यान, या विजयामुळे अल्कारेजने क्रमवारीतील दुसरे स्थानही निश्चित केले आहे. तसेच अल्कारेज आणि सिनर हे दोघे आत्तापर्यंत 8 वेळा आमने-सामने आले असून आता प्रत्येकी 4 विजयांसह बरोबरी झाली आहे.

सामन्यानंतर अल्कारेजने म्हटले की यासारख्या सामन्यात, जेव्हा एक सेट पराभूत झालेला असताना मानसिकरित्या कणखर राहणे महत्त्वाचे होते. विशेष म्हणजे पहिला सेट चालू असताना पावसामुळे जवळपास 3 तास हा सामना थांबवावा लागला होता.

Carlos Alcaraz - Jannik Sinner
Australian Open : इटलीच्या सिनरने इतिहास रचला; ४८ वर्षांनंतर इटलीच्या पुरुष खेळाडूची बाजी

आता अंतिम सामन्यात अल्कारेजचा सामना डॅनिल मेदवेदेवविरुद्ध होणार आहे. मेदवेदेवने उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या टॉमी पॉलला 1-6, 7-6(3), 6-2 अशा फरकाने पराभूत केले आहे.

अल्कारेज आणि मेदवेदेव यांच्यातील अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री अडीचनंतर सुरु होणार आहे.

महिलांच्या अंतिम सामन्यात पोलंडच्या अव्वल मानांकित इगा स्वियातेक आणि 9 व्या मानांकित ग्रीसच्या मारिया साकारीने प्रवेश केला आहे. या दोघींचा अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी रात्री 11.30 वाजता चालू होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com