बुद्धिबळ ऑलिंपियाड; भारताच्या सर्व संघाची कूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chess Olympiad Competition

बुद्धिबळ ऑलिंपियाड; भारताच्या सर्व संघाची कूच

मामल्लपुरम : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने भारतात पहिल्यांदा होत असलेल्या ४४ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत खेळताना स्वित्झर्लंडच्या यानिक पेलेटियरचा ६७ चालीनंतर पराभव केला. त्याच्या या विजयामुळे भारताच्या ‘ब’ संघाने स्वित्झर्लंडचा ४-० अशा फरकाने धुव्वा उडवला.

रविवारी भारताचे सर्वच्या सर्व सहा संघ मैदानात उतरले होते व त्यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेत आगेकूच केली. भारत ‘अ’ संघाने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ग्रीसचा ३-१ गुणांसह पराभव केला, तर संघ ‘क’ ने आइसलँडचा ३-१ असा पराभव केला. दुसरीकडे, भारतीय महिलांनीही ‍तिसऱ्या फेरीतील सर्व सामने जिंकून अचूक गुण मिळवले. भारत महिला ‘अ’ ने इंग्लंडचा ३-१, भारत ‘ब’ ने इंडोनेशियावर ३-१ आणि भारत ‘क’ने ऑस्ट्रियावर २.५-१.५ अशा फरकाने मात दिली.

आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले ते प्रज्ञानंदचे संघ ‘ब’ संघाकडून मैदानात उतरणे. कारण गेल्या दोन फेऱ्यांत तो संघाबाहेर होता. या सामन्यात प्रज्ञानंद काही वेळ पराभवाच्या उंबरठ्यावर दिसत होता मात्र, त्याने अखेरपर्यंत हार न मानता चांगल्या चाली खेळणे सुरूच ठेवले, ज्यामुळे यानिकला विजयाचा मार्ग शोधणे कठीण झाले.

अखेरीस यानिकच्या अनुभवासमोर भारताचा नवखा परंतु, मुरब्बी प्रज्ञानंद उजवा ठरला. ‘‘मी आज वाईट खेळलो, त्यामुळे आजच्या कामगिरीने मी समाधानी नक्कीच नाही, परंतु कितीही संघर्षपूर्ण परिस्थिती असली तरी, शांत राहून अखेरपर्यंत हार मानायची नाही असा चंग आज मी बांधला होता, ज्याचा फायदा मला आज झाला,’’ असे प्रज्ञानंदने विजयानंतर म्हटले आहे.

Web Title: Chennai Chess Olympiad Competition Indian Team Latest News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top