Chess Olympiad 2022: यजमान भारताने गाजवला पहिला दिवस

यजमान भारतीय संघातील बुद्धिबळपटूंनी बुद्धिबळ ऑलिंपियाड या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला.
Chess Olympiad 2022 All six Indian teams won day 1
Chess Olympiad 2022 All six Indian teams won day 1sakal

मामल्लपूरम : यजमान भारतीय संघातील बुद्धिबळपटूंनी बुद्धिबळ ऑलिंपियाड या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. भारताच्या सहाही संघांनीही शुक्रवारी विजयी सुरुवात केली. खुल्या गटातील तीन व महिला गटातील तीन अशा सहाही संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत आपले इरादे स्पष्ट केले.

युवा खेळाडू रौनक साधवानी याने शुक्रवारी येथे सुरू झालेल्या ४४ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत अब्दुलरहमान एम.विरुद्ध अप्रतिम विजय नोंदवून संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात भारत ‘ब’ संघाला विजयी सुरुवात करून दिली. त्यानंतर निहाल सरीन, डी. गुकेश व बी. अधिबन यांनी विजय मिळवले आणि भारताला संयुक्त अरब अमिरातीवर ४-० असे यश मिळवून दिले.

विदित गुजराती, अर्जुन इरिगेसी, नारायणनन एस. एल. व शशिकिरण कृष्णन यांचा सहभाग असलेल्या भारताच्या अ संघाने झिम्बाब्वेला ४-० अशी धूळ चारली. तसेच एस. पी. सेतुरामण, अभिजीत गुप्ता, मुरली कार्तिकेयन, अभिमन्यू पुराणिक यांचा सहभाग असलेल्या भारताच्या क संघाने दक्षिण सुदानला ४-० अशा फरकाने नमवले.

महिला गटातही वर्चस्व

महिला गटात भारताचे तीन संघ सहभागी झाले आहेत. कोनेरू हम्पी, तानिया सचदेव, आर. वैशाली व भक्ती कुलकर्णी यांचा सहभाग असलेल्या भारताच्या अ संघाने ताझिकिस्तानला ४-० असे पराभूत केले. त्यानंतर इशा करवडे, पी. व्ही. ननदिधा, एम. वार्शिनी साहिती, प्रत्युक्षा बोद्दा यांचा सहभाग असलेल्या भारताच्या क संघाने हाँगकाँगवर ४-० असा विजय साकारला. भारताच्या ब संघाने वेल्सला धूळ चारली. या संघामध्ये वंतिका अग्रवाल, सौम्या स्वामिनाथन, मेरी ॲन गोम्स व दिव्या देशमुख या खेळाडूंचा समावेश होता. बुद्धिबळ ऑलिंपियाडच्या सुरुवातीच्या फेरीचे उद्‍घाटन केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी विदित गुजराथीच्या बोर्डावर पहिली चाल टाकून केले. पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद, ‘फिडे’चे अध्यक्ष अर्काडी ड्वोरकोविच, भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष संजय कपूर आणि स्पर्धेचे संचालक भरत सिंह चौहान हेदेखील या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com