Cheteshwar Pujara : पुजाराने पुनरागमनासाठी कंबर कसली; शतकी खेळीमुळे 'या' खेळाडूवर इंग्लंड मालिकेपूर्वी टांगती तलवार

Cheteshwar Pujara News
Cheteshwar Pujara News
Updated on

Cheteshwar Pujara News : चेतेश्वर पुजारा बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. जिथे भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी गेला होता.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. पहिल्या कसोटीत भारताचा तीन दिवसांत एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला. तर भारताने दुसरी कसोटी दीड दिवसात 7 विकेटने जिंकली.

Cheteshwar Pujara News
SL vs ZIM ODI : सामना सुरू होण्याच्या काही तास आधी संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल अन्...

भारताने सेंच्युरियन कसोटी तीन दिवसांत गमावली होती, जिथे पुजाराची उणीव भासली होती. जून 2023 मध्ये त्याने भारतासाठी शेवटची कसोटी खेळली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दुर्लक्ष झाल्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुजाराची बॅट गर्जत होती.

सौराष्ट्रकडून खेळताना त्याने विराट सिंगच्या नेतृत्वाखालील झारखंडविरुद्ध अर्धशतक ठोकले आहे. दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत त्याने ७९ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या होत्या. पुजाराने 6 चौकार मारले आहेत.

Cheteshwar Pujara News
अवघ्या 7 धावांनी हुकले द्विशतक...! भारतीय निवडसमितीने दुर्लक्ष केलेल्या खेळाडूंची षटकार-चौकारची आतषबाजी

सौराष्ट्र आणि झारखंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात सौराष्ट्रकडून खेळताना चेतेश्वर पुजारा शानदार फलंदाजी करताना दिसत आहे. पुजाराने आपल्या फलंदाजीचे प्रदर्शन करत झारखंडविरुद्ध शामदार शतक ठोकले. वृत्त लिहेपर्यंत दुसऱ्या सत्राच्या अखेरीस 167 चेंडूत 109 धावा करून नाबाद आहे.

चेतेश्वर पुजाराची ही शानदार शतकी खेळी पाहिल्यानंतर आता सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. आणि सोशल मीडियावरही त्याची चर्चा होत आहे. त्याची ही शानदार खेळी पाहिल्यानंतर तो पुन्हा टीम इंडियात परतणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Cheteshwar Pujara News
T20 World Cup : 'किती पैशांची गरज आहे ते सांगा....' IND vs PAK एकाच ग्रुपमध्ये पाहून 'या' क्रिकेट बोर्डाने ICC ला डिवचलं

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलनंतर चेतेश्वर पुजाराला टीम इंडियामध्ये संधी मिळालेली नाही, परंतु रणजी ट्रॉफी 2024 मधील त्याचा उत्कृष्ट फॉर्म पाहता तो 5 सामन्यांच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकतो. जर निवडकर्त्यांनी त्याला घेण्यास रुची दाखवली, तर शुभमन गिलचा पत्ता कट होऊ शकतो.

खरं तर, शुभमन गिलला नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली होती. जो आधी म्हटला होता की, मी तीन नंबर पोझिशनवर बॅटिंग करतो. जेथे चेतेश्वर पुजारा बॅटिंग करत होता. पण त्या दौऱ्यावर त्याने काही खास कामगिरी केली नाही. त्यामुळे आता चेतेश्वर पुजारा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडियातून पुनरागमन करणार आणि शुभमन गिल बाहेर जाणार यांची चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

England squad for Pakistan Test series 2026
Cheteshwar Pujara on Ravindra Jadeja
Stephen Fleming appointed England Test head coach
Gautam Gambhir's coaching tenure has come under scrutiny
Marathi News Esakal
www.esakal.com