

ms dhoni farmhouse cobra rescue operation
esakal
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रांची येथील प्रसिद्ध ‘कैलाशपती’ फार्महाऊसमध्ये विषारी कोब्रा आढळून आल्याने काही काळ खळबळ उडाली. फार्महाऊसमधील कर्मचाऱ्यांचे लक्ष नागावर जाताच त्यांनी कोणताही धोका न पत्करता तातडीने सर्पमित्राला माहिती दिली.
माहिती मिळताच सर्पमित्र आणि सर्परेस्क्यू तज्ज्ञ नारायण प्रामाणिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सावधगिरीने कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे संभाव्य धोका टळला.