India in Commonwealth Games: आता वेध अहमदाबादमधील राष्ट्रकुल स्पर्धेचे; ग्लासगोमध्ये भारताची ३९ पदकांवर मोहर; ऑस्ट्रेलियन संघ पदकतालिकेत अव्वल स्थानी

India Finishes with 39 Medals in Glasgow: ग्लासगो स्पर्धेनंतर आता २०३० मध्ये अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
India in Commonwealth Games

India in Commonwealth Games

esakal

Updated on

ग्लासगो: येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सांगता रविवारी झाली. भारतीय खेळाडूंनी यंदाच्या क्रीडा महोत्सवात १३ सुवर्ण, १७ रौप्य व नऊ ब्राँझ अशा एकूण ३९ पदकांची कमाई केली. बॉक्सिंग, ॲथलेटिक्स व वेटलिफ्टिंग या खेळांमध्ये पदकांची लयलूट करण्यात भारताला यश लाभले. ज्युडो या खेळातील पदकांनी भारतातील युवा खेळाडूंना प्रेरणा दिली. आता २०३० मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतामध्ये होणार आहे. अहमदाबादमध्ये होणार असलेल्या पुढील क्रीडा महोत्सवाचे वेध आतापासूनच लागले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com