Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Gulveer Singh athletics Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताचा स्टार लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंग याने पुन्हा एकदा आपल्या जिद्दीची झलक दाखवत पुरुषांच्या ५००० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले.
Gulveer Singh won a sensational bronze medal in the men's 5000m

Gulveer Singh won a sensational bronze medal in the men's 5000m

Updated on

Gulveer Singh wins 5000m bronze Commonwealth Games 2026: उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यातील शिरसा (सिरसा) या एका छोट्या गावातून आलेल्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये शनिवारी नाट्यमय पदक जिंकले. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेलेल्या गुलवीरचा क्रीडा जगताशी किंवा मोठ्या स्पर्धांशी कोणताही संबंध नव्हता. आंतरराष्ट्रीय स्तरावर धावणे हे त्याचे कधीच ध्येय नव्हते. गावातील इतर तरुणांप्रमाणेच भारतीय सैन्यात (Indian Army) भरती होऊन कुटुंबाला स्थिरता देणे हे त्याचे स्वप्न होते. पण, तो खेळाकडे वळला अन् ग्लासगोत ऐतिहासिक कामगिरी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com