Tejas Shirse 110m hurdles final timing
ESAKAL
Tejas Shirse qualifies for Commonwealth Games 2026 final: सुरुवात थोडी खराब झाली असली, तरी भारताच्या तेजस अशोक शिर्से याने ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीच्या अंतिम फेरीतील आपली जागा पक्की केली. इंग्लंडच्या सॅम्युअल बेनेटने १३.२० सेकंदांच्या वेळेसह पहिले स्थान, जमैकाच्या जेरोम कॅम्पबेलने १३.३३ सेकंदांसह दुसरे स्थान, तर तेजसने १३.७६ सेकंदांसह तिसरे स्थान मिळवले आहे. तेजसची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ (जी राष्ट्रीय विक्रमही आहे) १३.२७ सेकंद आहे. पण, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज त्याला त्या कामगिरीला साजेशी वेळ नोंदवता आली नाही.