TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

Tejaswin Shankar creates history in CWG 2026: कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताच्या ॲथलेटिक्स इतिहासात तेजस्विन शंकर याने सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी केली. पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत ७,९७६ गुणांची कमाई करत त्याने भारतासाठी या प्रकारातील पहिलेच राष्ट्रकुल पदक निश्चित केले.
Tejaswin Shankar Commonwealth Games 2026 Decathlon Medal

Tejaswin Shankar Commonwealth Games 2026 Decathlon Medal

Updated on

Tejaswin Shankar Commonwealth Games 2026 Decathlon Medal : भारतीय ॲथलीट तेजस्विन शंकर याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेच्या इतिहासात एकाही भारतीयाला आतापर्यंत डॅकेथलॉन क्रीडा प्रकारात पदक जिंकता आले नव्हते, ते तेजस्विनने जिंकले. त्याने ग्रेनडाच्या लिंडन व्हिक्टर व कॅनडाच्या डॅमियन वॉर्नर यांना कडवी टक्कर देताना कांस्यपदक नावावर केले. इंग्लंडच्या सॅमी बॉल याला त्याने अखेरच्या क्षणाला मागे टाकले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com