`डेस्टिनेशन वेडिंग` वऱ्हाडींशिवाय कसे होईल; कोणाचे लग्न आणि कोण आहे वऱ्हाडी जरा वाचाच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

आता व्यावहारिक विचार करता, आयपीएलला परदेशी खेळाडूंची गरज आहेच, स्पर्धेच्या काही काळ त्यांना बोलवून कॉरंटाईन करावे लागेल.

नवी दिल्लीः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि येणारा पाऊस पाहता देशात आयपीएल होण्याची शक्यता कमी होत चालली आहे. त्यामुळे स्पर्धा परदेशात घेणे, हा पर्याय असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणत आहेत; पण डेस्टिनेशन वेडिंगला वऱ्हाडींशिवाय अर्थ राहणार नाही, असे सर्व फ्रँचाईसजचे मत आहे.

नक्की वाचा : मुंबईकर पावसाच्या प्रतिक्षेत! राज्यात मान्सून दाखल, मुंबईत पावसाचा 'लेट मार्क'

आयपीएल ही भारतातच व्हावी, केवळ फ्रँचाईससाठीच नव्हे, तर करोडो प्रेक्षकांचीही अशी भावना आहे, असा आग्रह फ्रँचाईसकडून करण्यात येत आहे. तुम्ही तांत्रिक बाजू बाजूला ठेवा; जर आयपीएल देशाबाहेर नेली, तर तुम्ही देशवासीयांना कोणता संदेश देणार आहात, याचा विचार करा. देशात जर कोणती स्पर्धा सुरू होणार नसेल, तर सामन्य जीवनही पूर्वपदावर आलेले नाही, हे सिद्ध होईल, असे मत फ्रँचाईसद्वारे व्यक्त करण्यात आले.क्रिकेट आपल्याकडे धर्म म्हणून पाहिला जातो, आयपीएलमुळे होणारा परिणाम कोणीही नाकारू शकत नाही. सध्या आपल्यावर एकामागोमाग एक आघात होत असताना आयपीएलच्या माध्यमातून आनंदाचे वातावरण तयार होईल, अशीही भावना व्यक्त करण्यात आली.

मोठी बातमीः सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो की....

आता व्यावहारिक विचार करता, आयपीएलला परदेशी खेळाडूंची गरज आहेच, स्पर्धेच्या काही काळ त्यांना बोलवून कॉरंटाईन करावे लागेल. प्रत्येक संघ सुमारे 25 ते 30 सदस्यांचा आहे. सर्वांचे विलगीकरण केले, तर स्पर्धा होऊ शकेल. तसेही आयपीएलला मिळणारे सर्वाधिक उत्पन्न टीव्ही प्रक्षेपणातून मिळते. स्टेडियमवरच्या तिकीट विक्रीतून फार उत्पन्न मिळत नसते, असाही मुद्दा फ्रँचाईसकडून मांडण्यात आला.

Corona Effect: Will this year's IPL season be 'abroad'? read detail story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Effect: Will this year's IPL season be 'abroad'? read detail story