esakal | कोरोना वाढतोय...कुस्तीपटूंनो जरा धीर धरा

बोलून बातमी शोधा

कोरोना वाढतोय...कुस्तीपटूंनो जरा धीर धरा

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत राष्ट्रीय कुस्तीगीरांचे शिबिर घेण्याची भारतीय कुस्ती महासंघाची तयारी नाही.

कोरोना वाढतोय...कुस्तीपटूंनो जरा धीर धरा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली ः देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत राष्ट्रीय कुस्तीगीरांचे शिबिर घेण्याची भारतीय कुस्ती महासंघाची तयारी नाही. महासंघाने देशातील सर्वच कुस्तीगीरांना कोरोनापासून बचाव करण्यासाठीचे सरकारने सुचवलेले सर्व उपाय अंमलात आणण्याची सूचना केली आहे आणि फार तर जुलैपासून शिबिर सुरू करण्याचा विचार केला आहे. 

ऑलिंपिक समितीचे उपप्रमुख कोझो ताशीमा यांना कोरोनाची लागण

कुस्तीगीरांच्या आरोग्याबाबत कोणताही धोका पत्करणार नाही, असे महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले. ते म्हणाले, देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या परिस्थितीत शिबिर घेण्याचा धोका कसा पत्करणार? आता 30 जूनच्या सुमारास आम्ही परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर शिबिराबाबत निर्णय घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले. शिबिर सुरू करण्याची घाई करण्याची गरज नाही. आम्ही सर्व कुस्तीगीरांच्या सातत्याने संपर्कात आहोत, असे त्यांनी सांगितले. 

भारतीय कुस्ती महासंघ शिबिर जास्त लांबवण्यास तयार नाही. कोरोना रुग्णांची दिल्लीसह उत्तर प्रदेश तसेच हरियाणात वाढ होत असल्याने शिबिराचे संयोजन जास्त अवघड झाले आहे. कुस्तीगीरांचे शिबिर महासंघ लखनौ अथवा सोनीपतला घेत असते. आता याऐवजी पर्यायी शहरांचा विचार कुस्ती महासंघ करीत आहे. अर्थात कोरोनाची संख्या कमी असलेल्या राज्याची निवड होणार आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना आयपीएलसाठी भारतात खेळण्याची परवानगी मिळणार का?

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ऑलिंपिक क्रीडापटूंचे शिबिर सुरू करण्यास मंजुरी दिली आहे; मात्र कुस्ती महासंघ शिबिराची तारीख लांबवत आहे. महासंघाने काही आठवड्यापूर्वी शिबिर सुरू करण्याबाबतची योजना सादर केली होती. त्यात शिबिरासाठी आलेल्या कुस्तीगीरांची चाचणी होईल. चाचणीचा निकाल येईपर्यंत कुस्तीगीर विलगीकरणात राहतील, असे सांगितले होते. ती योजना मान्य झाली होती; मात्र अनेक कुस्तीगीरांना शिबिरात सहभागी होऊन सराव करण्याऐवजी सध्या वैयक्तिक सराव करणेच योग्य होईल, असे सांगितले