आयपीएल खेळायचीय; मग अगोदर 'याला' हकलायला हवे ना...?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

आयपीएलसाठी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर हा कालावधी मिळाला, तर ही स्पर्धा देशात की परदेशात खेळवायची, यावरून भारतीय क्रिकेट मंडळात 3-2 अशी विभागणी झाली आहे.

मुंबईः आयपीएलसाठी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर हा कालावधी मिळाला, तर ही स्पर्धा देशात की परदेशात खेळवायची, यावरून भारतीय क्रिकेट मंडळात 3-2 अशी विभागणी झाली आहे. आयपीएल देशात खेळवायची, तर अगोदर कोरोना घालवायला हवा, असा मुद्दा बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने उपस्थित केला. 

वाचा ः लॉकडाऊनवर भाष्य करणाऱ्या 'उठेंगे हम' चित्रफितीचा डिजिटल प्रीमियर

ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक ट्‌वेन्टी-20 स्पर्धा पुढे ढकलली जाऊन तो कालावधी आयपीएलसाठी मिळणार, हे हळूहळू निश्‍चित झाले आहे. 10 जून रोजी होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत वर्ल्डकप स्पर्धा पुढे ढकलली जाण्याचा निर्णय अपेक्षित आहे. आयपीएल आपल्या देशात खेळवायला कोणालाही आवडेल; पण त्याअगोदर देशात फैलावत असलेल्या कोरोनाला घालवायला लागेल. अशा परिस्थितीत जर आवश्‍यकता भासली, तर आयपीएल परदेशात खेळवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे. 

वाचा ः अरे वाह! मान्सूनसाठी कोंकण रेल्वे सज्ज; लवकरच लागू होणार वेळापत्रक.. 

सध्या तरी बीसीसीआय पदाधिकाऱ्यांमध्ये 3-2 असा मतप्रवाह आहे. आयपीएल देशात झाली तर लोकांमध्येही सकारात्मक संदेश जाईल, तसेच आपल्या खेळाडूंना देशाबाहेर जाण्याची गरज नाही, असे काहींचे मत आहे; पण जर स्पर्धेला प्राधान्य द्यायचे असेल तर कोरोनाची स्थिती पाहता सध्या तरी परदेशात खेळवणे योग्य ठरेल, असे इतरांना वाटत आहे. आम्ही दोन्ही पर्यायांवर विचार करत आहोत. शेवटी खेळाडू आणि आयपीएलशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची प्रकृती सर्वांत महत्त्वाची आहे, असे बीसीसीआयच्या या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

वाचा ः आपल्या मुलाशी व्हि़डीओ कॉलवर बोलण्यासाठी चक्क घ्यावी लागली न्यायालयाची मदत! वाचा बातमी सविस्तर

देशात खेळण्यास संघमालकही उत्सुक 
आयपीएल देशात झाली, तर भारत देश कोरोनापासून सुरक्षित होत आहे, हा संदेश जगाला देऊ शकतो, तसेच जनजीवनही पूर्वपदावर येत आहे, हा विश्वास देशवासींनाही मिळू शकतो. तसेच परदेशात खेळवण्यासाठी लागणारा अतिरिक्त खर्चही वाचू शकतो. त्यामुळे आयपीएलमधील सर्व संघमालकही देशातच स्पर्धा खेळवण्यास आग्रही असतील, असे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona should be went off before indian premier league matches