टीम इंडियाला मोठा दिलासा; ट्रेंट बोल्टनं घेतली माघार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

trent boult
टीम इंडियाला मोठा दिलासा; ट्रेंट बोल्टनं घेतली माघार

टीम इंडियाला मोठा दिलासा; ट्रेंट बोल्टनं घेतली माघार

sakal_logo
By
सुशांत जाधव

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यूझीलंडच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज असलेल्या ट्रेंट बोल्टने (Trent Boult) कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. 12 आठवडे सातत्याने खेळत असलेला ट्रेंट बोल्ट भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी-20 मालिकेनंतर मायदेशी परतणार आहे. बोल्ट तीन टी20 सामन्याच्या मालिकेसाठी युएईतून भारतात दाखल झाला आहे. 17 नोव्हेंबर पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी कोलकाताच्या मैदानात ट्रेंट बोल्ट भारताच्या दौऱ्यावरील अखेरचा सामना खेळेल.

भारत दौऱ्यानंतर बांगलादेशचा संघ न्यूझीलंड दौरा करणार आहे. घरच्या मैदानावरील मालिकेसाठी ताजेतवाने होण्यासाठी बोल्टने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. बोल्ट टी20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup 2021) स्पर्धेपूर्वी आयपीएलच्या दुसऱ्या हंगामातही मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.

हेही वाचा: IND vs NZ : "आता विराट संघात काय करणार?"; रोहितने दिलं उत्तर

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ट्रेंट बोल्टचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात बोल्टनं म्हटलंय की, वर्ल्ड कप स्पर्धेपाठोपाठ भारतीय संघाविरुद्ध भारतात खेळणं निश्चित आव्हानात्मक असते. भारत दौऱ्यासाठी संघातील खेळाडू तयार आहेत. खेळपट्टीचा योग्य अंदाज बांधण महत्त्वाचं ठरेल, असेही त्याने म्हटले आहे.

हेही वाचा: अमेरिका T 20 वर्ल्ड कपचा यजमान; ICC च्या 8 स्पर्धा आणि 12 देशांची संपूर्ण यादी

भारत दौऱ्यातील सामन्यासह घरच्या मैदानात होणाऱ्या मालिकेसाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. मागील 12 आठवडे क्रिकेट खेळत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पराभव पचवणे कठीण आहे. क्रिकेटच्या मैदानात असा अनुभव येतच राहतो, असे सांगत त्याने टी-20 मालिकेत जोमाने कमागिरी करुन दाखवण्याचा ध्यास त्याने बोलून दाखवला.

loading image
go to top