बळजबरीनं पाजली दारू ; क्रिकेटरचे धक्कादायक खुलासे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

azeem rafiq on racism
बळजबरीनं पाजली दारू ; क्रिकेटरचे धक्कादायक खुलासे

बळजबरीनं पाजली दारू ; क्रिकेटरचे धक्कादायक खुलासे

sakal_logo
By
सुशांत जाधव

यॉर्कशरचा माजी क्रिकेटपटू अजीम रफिक (Azeem Rafiq) ने मंगळवारी जो रूट (Joe Root) वर नाराजी व्यक्त केलीये. तो एक भला माणूस आहे. पण वर्णद्वेषाच्या मुद्याकडे त्याने कानाडोळा केल्याची खंत वाटते, असे अजीम रफीकने म्हटले आहे. ब्रिटेनच्या खासदारांच्या समोर झालेल्या सुनावणीवेळी रफिकने क्लबकडून खेळताना वर्णद्वेष आणि भेदभाव झाल्याचे अनुभव सांगितले. काही दिवसांपूर्वीच रूटने यॉर्कशर (Yorkshire) काउंटी क्लबमधील वर्णद्वेषाची निंदा केली होती.

सुनावणी वेळी अजीम रफिक म्हणाला की, ज्यो रुट एक चांगला व्यक्ती आहे. त्याने कधीच वर्णद्वेषावरुन भेदभाव केला नाही. पण तो जेव्हा गॅरी बँलेंससोबत असायचा त्यावेळी मला राग यायचा. कदाचित त्याला आठवत नसेल, पण गॅरी मला पाकी (पाकिस्तानी नागरिकांना उद्देशून वापरलेला शब्द) म्हणायचा. त्याने स्वता ही गोष्ट कबुल केलीये. पण रुट हे सर्व मैत्रीच्या भावनेतून बोलतोय अशी समजूत घालायचा, असेही रफिकनं म्हटले आहे. यापूर्वी रुटने माझ्यासमोर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे म्हटले होते.

हेही वाचा: टीम इंडियाला मोठा दिलासा; ट्रेंट बोल्टनं घेतली माघार

बळजबरीने पाजली दारु...

क्लबकडून खेळताना मला पाकी नावाने बोलवले जायचे. अधिकाऱ्यांनी याविरोधात कोणतीह कठोर कारवाई केली नाही. एवढेच नाही तर 15 व्या वर्षी मला जबरदस्तीने दारु पिण्यास भाग पाडले. लोकल क्लबमध्ये माझ्याबाबत ही घटना घडली होती. ही घटना भयावह होती. दारु पिल्याशिवाय यॉर्कशरकडून खेळायलाच मिळणार नाही, अशी भावनाही निर्माण झाल्याची गोष्ट अजीम रफिकनं सांगितली.

हेही वाचा: Champions Trophy पाकिस्तानात; टीम इंडिया खेळण्यास 'राजी' होणार?

पाकीसोबतच केविन शब्दाचाही केला जायचा मारा

अजीम रफिकने आपल्या जबानीत म्हटलंय की, आशियन लोकांना केविन नावाने बोलवले जायचे. गॅरी बॅलेंस दुसऱ्या वर्णाच्या लोकांना या नावाने बोलवायचा. त्याचा मित्र आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटर एलेक्स हेल्स यांनी आपल्या श्वानाचे नावही केविन ठेवल्याचा किस्साही त्याने शेअर केला.

loading image
go to top