AUS vs ENG : अ‍ॅशेसची तयारी; इंग्लिश प्लेयरसाठी जड्डू 'मार्गदर्शक'

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित अ‍ॅशेस मालिकेला आता अवघे काही दिवस उरले आहेत
Ravindra Jadeja
Ravindra JadejaFile Photo

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित अ‍ॅशेस मालिकेला (AUS vs ENG The Ashes 2021-22) आता अवघे काही दिवस उरले आहेत. ऑस्‍ट्रेलिया दौरा गाजवण्यासाठी इंग्‍लंडचा फिरकीपटू जॅक लीच (Jack Leach) भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाजेजाच्या (Ravindra Jadeja) व्हिडिओचा अभ्यास करत आहे. लीच हा जाडेजाच्या गोलंदाजीनं चांगलाच प्रभावित झालाय.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कमालीची कामगिरी करुन दाखवली होती. पहिल्या कसोटी सामन्यात 36 धावांत ऑल आउट होणाऱ्या टीम इंडियाने दमदार कमबॅक करत कांगारुंना घरच्या मैदानात पराभवाचे पाणी पाजले होते. इंग्लंडचा संघ याच मालिकेतून प्रेरणा घेत आहे. या मालिकेत रविंद्र जाडेजाने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळेच लीच जड्डूची गोलंदाजी पाहून कांगारुंना जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन आखताना दिसतोय.

Ravindra Jadeja
प्रितीच्या पंजाबची स्मार्ट खेळी; पर्समध्ये ठेवली मोठी रक्कम

इंग्लंडच्या लीचने 16 कसोटी सामन्यात 62 विकेट्स मिळवल्या आहेत. पण अद्याप त्याने ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरी करण्यासाठी तो रविंद्र जाडेजाचे व्हिडिओ पाहत आहे. यासंदर्भात तो म्हणाला की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाडेजाने आपली नैसर्गिक गोलंदाजी केली. ज्याप्रमाणे तो घरच्या मैदानात गोलंदाजी करतो अगदी तोच पॅटनर्न त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आजमवला आणि त्याला यशही मिळाले. या वक्तव्यातून लीचने कांगारुंविरोधात जाळे विणण्यासाठी जाडेजासारखी रणनिती आखण्याचे संकेतच दिले आहेत.

Ravindra Jadeja
IND VS NZ : रहाणे, पुजाराला संधी मिळणार?

यावेळी जॅक लीचने प्रतिस्पर्धी संघातील नॅथन लायनच्या कामगिरीलाही दाद दिली. तो म्हणाला की, नॅथन लायनने ही लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली आहे. बऱ्याच वर्षांपासून त्याची गोलंदाजी पाहत आहे. त्याच्या गोलंदाजी शैलीत काही खास गोष्टी आहेत. ज्या खेळपट्टीवर चेंडू वळत नाही त्यावेळी उसळता चेंडू टाकून फलंदाजांना तो सरप्राइज देतो. आगामी दौऱ्यासाठी या आक्रणाचाही विचार करत आहे. त्याशिवाय माझ्याकडे असलेल्या शैली मजबूत सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com