IND VS NZ : रहाणे, पुजाराला संधी मिळणार?

मयांकऐवजी चेतेश्‍वरला सलामीला पाठविण्याचा पर्याय
IND VS NZ
IND VS NZसकाळ

मुंबई : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी झुंजार वृत्तीचे प्रदर्शन दाखवत कानपूर कसोटी ड्रॉ राखली. त्यामुळे आता ३ डिसेंबरपासून मुंबईत खेळवण्यात येणारा दुसरा कसोटी सामना यजमान भारतासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. या कसोटीत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याचे पुनरागमन होणार आहे. विराट कोहलीच्या आगमनानंतर साहजिकच एका फलंदाजाला बाहेर बसावे लागणार आहे. हा फलंदाज कोण असेल?

कर्णधार अजिंक्य रहाणे व उपकर्णधार चेतेश्‍वर पुजारा यांना पहिल्या कसोटीत आपला ठसा उमटवता आलेला नाही. गेल्या वर्षभरात दोघांनाही प्रतिमेला साजेशी कामगिरीही करता आलेली नाही. त्यामुळे दोघांपैकी एकाला पुढील कसोटीसाठी डच्चू देण्यात येईल, असा सूर या वेळी उमटू लागला आहे. पण टीम इंडियाचे व्यवस्थापन दोघांनाही आणखी संधी देईल, अशी दाट शक्यता आहे.

IND VS NZ
CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत

अजिंक्य रहाणेला २०२१ मध्ये पार पडलेल्या २१ कसोटींमध्ये फक्त ४११ धावाच फटकावता आलेल्या आहेत. यादरम्यान त्याने अवघ्या १९.५७ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. चेतेश्‍वर पुजाराची आकडेवारीही फारशी चांगली नाही. भारत-इंग्लंड यांच्यामध्ये या वर्षी मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत त्याच्या बॅटमधून सहा डावांमध्ये फक्त १३३ धावा निघाल्या आहेत. त्यानंतर भारत-इंग्लंड यांच्यामधील इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत त्याने दोन अर्धशतकांसह २२७ धावा केल्या. भारत-न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियन्सशिपच्या अंतिम फेरीच्या लढतीत त्याला २३ धावाच करता आल्या.

दुसऱ्या कसोटीसाठीचे पर्याय

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शुभमन गिलसह मयांक अग्रवालला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, पण त्याच्याकडून दोन्ही डावांमध्ये निराशाच झाली. यामुळे मुंबईतील कसोटीत त्याला वगळून शुभमन गिलसोबत चेतेश्‍वर पुजाराला सलामीला पाठवण्यात येऊ शकते. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळू शकते. या वेळी चौथ्या क्रमांकावर विराट कोहली, पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे व सहाव्या स्थानावर यष्टिरक्षक फलंदाजी करू शकेल.

भारत-न्यूझीलंड यांच्यामधील दुसरा कसोटी सामना मुंबईत रंगणार आहे. त्यामुळे या कसोटीसाठी भारताच्या संघात अधिक मुंबईकर खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपकर्णधार अजिंक्य रहाणे, पहिल्या कसोटीतील सामनावीर श्रेयस अय्यर या दोघांसह सूर्यकुमार यादवलाही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. अशा वेळी चेतेश्‍वर पुजारा, मयांक अग्रवाल यांच्यापैकी कोणाला बाहेरचा रस्ता दाखविण्यात येईल, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com