शास्त्रींप्रमाणे द्रविडमध्ये 'मी'पणा दिसणार नाही; गंभीरचं रोखठोक मत | Gambhir Comper Shastri And Dravid | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dravid, Gambhir And Shastri
"शास्त्रींप्रमाणे द्रविडमध्ये 'मी'पणा दिसणार नाही"

"शास्त्रींप्रमाणे द्रविडमध्ये 'मी'पणा दिसणार नाही"

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे प्रसिद्ध आहे. राजकारणात भाजपचे प्रतिनिधीत्व करत असतानाही तो राजकीय भुमिकेसह क्रिकेटमधील गोष्टींवर परखड मते मांडत असतो. न्यूझीलंड विरुद्धच्या टीम इंडियाच्या दमदार विजयानंतर त्याने भारतीय संघाचा नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यात तुलना केली आहे. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेलो नाही. पण ते आपण मिळवलेल्या यशबद्दल स्वत:च बोलतात. स्वत: कौतुक करणे आणि दुसऱ्याने आपल्या यशाचा पाढा वाचून दाखवण यात फरक असतो, असे म्हणत त्यांनी शास्त्रींना टोला लगावला आहे.

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. विराट कोहलीनेही कर्णधारपद सोडलं. वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या सामन्यानंतर शास्त्री गुरुजींनी टीम इंडियाने परदेशात मिळलेल्या विजयाचा दाखला देत आपल्या कारकिर्दीतील यशाचा उंचावणारा आलेख दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट गंभीरला खटकली आहे.

हेही वाचा: Video: अरे देवा! अजब गजब पद्धतीने घालवली स्वत:ची विकेट

द्रविड आणि माजी कोच शास्त्रींची तुलना करताना गंभीर म्हणाला की, ' रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात मी टीम इंडियाकडून खेळलेलो नाही. पण तुम्ही स्वत: ज्यावेळी उत्तम कामगिरी केल्याचे कौतुक करता ते ऐकायला विचित्र वाटते. तुमच्या कामगिरीचे कौतुक इतर लोकांनी करणंच तुमची पोहच पावती असते. 2011 मध्ये ज्यावेळी आम्ही वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी आमची टीम जगातील सर्वात्तम आहे, हे आम्हाला सांगावे लागले नाही, अशा शब्दांत गंभीरने शास्त्रींना टोमणा मारला. तो पुढे म्हणाला, तुम्ही ऑस्ट्रेलिया जाऊन जिंकलात. इंग्लंडमध्येही तुम्ही दमदार कामगिरी केली. यात कोणतीच शंका नाही. पण त्या कामगिरीचे कौतुक दुसऱ्याने करु द्या.

हेही वाचा: Syed Mushtaq Ali Trophy कोणी किती वेळा जिंकलीये माहितीये?

राहुल द्रविडकडून आपल्याला असा प्रकार घडल्याचे पाहायला मिळणार नाही, असा ठाम विश्वासही गंभीरने यावेळी व्यक्त केला. विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड केवळ खेळाडूंना क्रिकेटचे धडे देणार नाही तर तो खेळाडूंना उत्तम व्यक्ती कसे बनायचे हे देखील शिकवेल, अशा शब्दांत गंभीरने द्रविडवर कौतुकाचा वर्षाव केला.

loading image
go to top