हार्दिक पांड्याचं काही खरं नाही; BCCI निवड समिती 'नो रिस्क मूड'मध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya
हार्दिक पांड्याचं काही खरं नाही; निवड समितीचा 'नो रिस्क मूड'

पांड्याचं काही खरं नाही; BCCI निवड समिती 'नो रिस्क मूड'मध्ये

भारत-न्‍यूझीलंड (India vs New Zealand) टी 20 मालिकेतून डच्चू मिळालेल्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) ला पुन्हा संघात स्थान मिळणे खूप मुश्किल आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या (India vs South Africa) मालिकेसाठीही निवड समिती त्याच्या नावाचा विचार करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे वृत्त आहे. इनसाइड स्‍पोर्ट्सच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्याला राष्‍ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये हजेरी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. फिटनेस टेस्‍टनंतर त्याच्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

हार्दिक पांड्या टी 20 वर्ल्‍ड कप 2021 स्पर्धेत भारतीय संघाचा हिस्सा होता. पण पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. शभर टक्के फिट नसताना त्याला संघात स्थान दिले का? या प्रश्नामुळे निवड समितीची कोंडी झाली होती. त्यामुळेच चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती हार्दिक पांड्यासंदर्भातील निर्णय हलक्यात घेण्याच्या मूडमध्ये नाही.

हेही वाचा: Video: सैय्यमीने बॅट हातात घेत गोलंदाजाला दिला चोप

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "दुखापतीतून सावरण्यासाठी हार्दिक पांड्याला पूरेशी विश्रांती मिळणे गरजेच आहे. त्याला लवकरात लवकर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जॉइन होण्यास सांगण्यात आले आहे. सध्याच्या घडीला हार्दिक पांड्या कसोटीसाठी फिट वाटत नाही. हा एक चिंतेचा विषय असून त्याच्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची घाई होणार नाही. तो फिट असेल तर त्याला वनडे आणि टी-20 मध्ये संघात घेण्याचा विचार निश्चित करु", असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

हेही वाचा: पिळवी जर्सी झिंदाबाद... क्रिकेटच्या इतिहासातील खास योगायोग!

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेन होईल. त्यानंतर वनडे आणि टी-20 मालिका नियोजित आहे. या मोठ्या दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याला संधी मिळणे जवळपास मुश्कील दिसत आहे. फिटनेसच्या परीक्षेत तो पास झाला तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो. पण हा प्रवास वाटतोय तितका सोपा निश्चितच नसेल.

loading image
go to top