esakal | 87 वर्षानंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे आयोजन रद्द; BCCI चा मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

jay shah

सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे BCCI चे सचिव जय शहा यांनी ही माहिती कळवली आहे.

87 वर्षानंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे आयोजन रद्द; BCCI चा मोठा निर्णय

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं मोठा निर्णय घेतला असून अनेक भारतीय क्रिकेटपटूंना घडवणारी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धा रद्द केल्याचं जाहीर केलं आहे. सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे BCCI चे सचिव जय शहा यांनी ही माहिती कळवली आहे. तसेच रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज 45 हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देणार असल्याचं जय शहा यांनी पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे. 

महात्मा गांधींच्या प्रतिमेची अमेरिकेत तोडफोड; चेहऱ्याचा भाग गायब

कोरोनामुळे देशातील खेळाची दशा आणि दिशा बदलली आहे. एप्रिलमधील आयपीएलच्या 14 व्या सीजनचे आयोजन फिक्स आहे, अशात बीसीसीआयजवळ स्पर्धेसाठी केवळ दोन महिन्यांचा वेळ आहे. यामुळे बीसीसीआयने सर्व संघांना विजय हजारे ट्रॉफी किंवा रणजी ट्रॉफीमधून एका स्पर्धेची निवड करण्याची विनंती केली होती. 

रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमधील कोणती स्पर्धा खेळवायची याबाबत BCCI ने सर्व राज्य संघटनांना पत्र लिहून त्यांचं मत विचारलं होतं. त्यावेळी बहुतेक संघटनांनी विजय हजारे ट्रॉफी खेळवण्यास पसंती दिली होती. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) मात्र रणजी ट्रॉफी खेळवण्याच्या बाजूनं होते.

'शेतकऱ्यांचा अपमान सहन होत नाही'; अनेक भाजप नेते राजीनाम्याच्या...

कोणती स्पर्धा होणार?

सध्या सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा (Syed Mushtaq Ali Trophy 2021) सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धा होईल. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसाची लढत असते. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात.

दरम्यान, 1934 साली पहिल्यांदा सुरु करण्यात आलेल्या या स्पर्धेचे नाव राजकुमार आणि क्रिकेटर केएस रणजीत सिंह यांच्या नावावर ठेवण्यात आलं होतं. त्यांनी 1896 ते 1902 दरम्यान इंग्लडमध्ये 15 टेस्ट खेळले होते. क्रिकेटमधील लेट कट आणि लेग ग्लांससारख्या शॉटचे जनकत्व रणजीत सिंह यांच्याच नावावर जाते. रणजी ट्रॉफीची सर्वात यशस्वी टीम मुंबई आहे, मुबंईने 41 वेळा फायनल जिंकलं आहे. वसीम जाफर स्पर्धेचा सर्वाधिक यशस्वी खेळाडू असून त्यांच्या नावावर 10 हजार 738 धावा आहेत.