सेहवागच्या 'त्या' कमेंटवर शोएब म्हणाला...

Shoaib Akhtar vs Virender Sehwag
Shoaib Akhtar vs Virender Sehwag Sakal

मुंबई : पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत तुफान 'बोलंदाजी' करताना दिसतोय. आपल्या कारकिर्दीत भेदक माऱ्याने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांसमोर चॅलेंज निर्माण करणारा अख्तर युट्यूबच्या माध्यमातून आपल्या काळातील किस्से शेअर करत असेल. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात ज्या ज्या वेळी लढत व्हायची त्यावेळी शोएब अख्तर चर्चेत राहायचा. नुकताच शोएब अख्तर याने एक नवा व्हिडिओ आपल्या यूट्युब चॅनेलवरुन शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तो विरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) फटके देण्याची गोष्ट करताना दिसते.

Shoaib Akhtar vs Virender Sehwag
दिवस फिरतात; भारताकडून 2 वर्ल्डकप खेळलेला खेळाडू झाला गुजरातचा नेट बॉल

अख्तर प्रमाणेत भारतीय संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सोशल मीडियावर फटकेबाजी करत असतो. आपल्या वक्तव्याने तो पाकिस्तानी खेळाडूंची शाळा घेताना दिसते. विरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर यांच्यात मैदानात द्वंद्व पाहायला मिळाले असले तरी मैदाना बाहेर या दोघांच्यात चांगली मैत्री आहे. दोघही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांविरोधात मजेशीर कमेंट्स करताना दिसते. त्याचा हा खेळही चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करतो.

Shoaib Akhtar vs Virender Sehwag
..तर भारताचे लोक तुला जिवंत जाळतील; शोएबने सांगितला 'तो' किस्सा

शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar YouTube channel) एका चॅट शोमध्ये भाग घेतला होता. यावेळी त्याला विरेंद्र सेहवागने त्याच्या फोटोवर दिलेल्या कमेंट्वर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर काय बोलावे ते अख्तरला पटकन सुचत नाही. ज्या दिवशी सेहवाग भेटेल त्या दिवशी त्याला फटके देईन, असे तो म्हणाला.

शोएब अख्तर याने ट्विटरवर सुटाबूटात एक फोटो शेअर केला होता. यावर विरेंद्र सेहवागने खास प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले होते. सेहवागने त्याच्या फोटोवर कमेंट देताना लिहिले होते की, "ऑर्डर लिख- एक बटर चिकन, दो नॉन, एक बीयर". या प्रतिक्रियेवर अख्तरने मजेशीर अंदाजात सेहवागला मारावे वाटते, असे उत्तर दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com