AB de Villiers
AB de VilliersX/lCC

AB de Villiers: 'हे लाजिरवाणेच...', टी20 वर्ल्ड कपच्या तोंडावर दक्षिण आफ्रिकेबद्दलच्या त्या चर्चांमुळे डिविलियर्स भडकला

AB de Villiers on Controversy around South Africa: टी20 वर्ल्ड कप तोंडावर असताना दक्षिण आफ्रिका संघाबाबत होत असलेल्या काही वादांवर डिविलियर्सने तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

AB de Villiers on Controversy around South Africa: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरुवात होत आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेत मात्र वेगळेच वादाचे मुद्दे चर्चेत असून त्यावर माजी कर्णधार एबी डिविलियर्सने नाराजी व्यक्त केली आहे.

टी20 वर्ल्ड कप तोंडावर असताना दक्षिण आफ्रिका संघातील वांशिक कोटा बाबत सध्या चर्चा होत आहेत. त्याचमुळे बोलताना डिविलियर्सने म्हटले आहे की हे लाजिरवाणे आहे.

साल 2018 मध्ये निवृत्त झालेल्या डिविलियर्सने जिओ सिनेमाशी बोलताना म्हटले की 'अशा विषयांवर लक्ष्य केंद्रित करून स्पर्धेत सहभागी होणे लाजिरवाणे आहे. मी म्हणायचंय हे काही नवीन नाही, पण हे फक्त लाजिरवाणे आहे. माझं सौभाग्य आहे की याकाळात मी संघात नाही, मला तेथील गोष्टींशी काहीही घेणंदेणं नाहीये. मी आता फक्त प्रेक्षक आहे.'

AB de Villiers
T20 World Cup 2024: फिल्डिंगसाठी उतरले कोच आणि सिलेक्टर, वर्ल्डकप सामन्यात टीम ऑस्ट्रेलियावर का आली अशी वेळ?

खरंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट यापूर्वीही वांशिक भेदभावामुळे अनेकदा चर्चेत आले आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या 2016 पासून लागू झालेल्या पॉलिसीनुसार दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 6 खेळाडू अश्वेत हवेत, ज्यात दोन कृष्णवर्णीय आफ्रिकन समुहाचे भाग असायला हवेत.

सध्या टी20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या दक्षिण आफ्रिका संघात कृष्णवर्णीय आफ्रिकन समुहाचा एकमेव कागिसो रबाडा संघात आहे. तसेच लुंगी एन्गिडी हा देखील कृष्णवर्णीय आफ्रिकन समुहाचा खेळाडू आहे, पण त्याचा समावेश राखीव खेळांडूंमध्ये आहे. याचमुळे दक्षिण आफ्रिकेत चर्चा सुरू आहे.

याशिवाय दक्षिण आफ्रिका संघात अश्वेत खेळाडूंमध्ये रिझा हेंड्रिक्स, ब्योर्न फोच्युईन, केशव महाराज, ताब्राईज शम्सी आणि ओटनील बार्टमन आहेत.

AB de Villiers
T20 World Cup 2024 : तुफान वादळात स्टेडियमची तुटली स्क्रीन; T20 वर्ल्ड कपपूर्वी 'या' संघांचे सामने रद्द

दक्षिण आफ्रिकेत होत असेल्या चर्चांबद्दल डिविलियर्स पुढे म्हणाला, 'नेहमीप्रमाणेच वर्ल्ड कपच्या आधी दक्षिण आफ्रिका संघाबाबत मायदेशात विवादात्मत चर्चा होत आहेत. मला वाटते हा चांगला संघ आहे. लुंगीबद्दल वाईट वाटते, त्याला काही दुखापती होत्या आणि त्याने त्याची थोडी लय गमावली होता. नाहीतर, जर तो संघात असता, तर मायदेशात कोणतेही वाद झाले नसते.'

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेला टी20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना 3 जून रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे.

टी20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ - एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्च्युइन, रिझा हेंड्रिक्स, मार्को यान्सिन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, एन्रिक नॉर्किया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तब्राईज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.

राखीव खेळाडू - नांद्रे बर्गर आणि लुंगी एन्गिडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com