Kane Williamson One Handed Six | Video: केन विल्यमसनचा 'बाएं हाथ का खेल'... लगावला एकहाती षटकार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kane-Williamson-One-Handed-Six

ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर खेचला उत्तुंग षटकार

Video: विल्यमसनचा 'बाएं हाथ का खेल'... लगावला एकहाती षटकार!

NZ vs AUS, T20 World Cup Final: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने २० षटकात ४ बाद १७२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या १० षटकात तो निर्णय गोलंदाजांनी सार्थदेखील ठरवला, पण शेवटच्या १० षटकात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने डावाला तुफान गती दिली. या डावात केन विल्यमसनचा एकहाती षटकार विशेष आकर्षण ठरले.

हेही वाचा: NZ vs AUS Final: कोण ठरेल वरचढ? पाहा आकडेवारी काय सांगते...

केन विल्यमसनला २१ धावांवर असताना एक जीवदान मिळालं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. तुफान फटकेबाजी करत त्याने संघाला झटपट धावा करून दिल्या. त्याने फटकेबाजी करताना एक असा षटकार खेचला की त्याने सारेच अवाक झाले. १३ वे षटक टाकण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलला पाचारण करण्यात आले. पण त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. याउलट षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर केन विल्यमसनने त्याला लेग साईडला एका हाताने उत्तुंग असा षटकार लगावला आणि साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले.

हेही वाचा: AUS vs NZ, T20 WC Final Live: ऑस्ट्रेलियासमोर 173 धावांचे लक्ष्य

विल्यमसनचा एकहाती षटकार-

हेही वाचा: Video : विल्यमसनचा एक कॅच सोडणं ऑस्ट्रेलियाला पडलं भारी

दरम्यान, त्या फटक्यानंतरही विल्यमसनने तुफान फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला एका षटकात धू-धू धुतले. ३२ चेंडूत त्याने आपलं अर्धशतक साजरं केलं. पण शतकाने मात्र विल्यमसनला हुलकावणी दिली. विल्यमसनने ४८ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकार लगावत ८७ धावांची खेळी केली. मार्टीन गप्टील (२८) वगळता इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवणं शक्य झालं नाही. जोश हेजलवूडने १६ धावांमध्ये ३ बळी टिपले, पण मोक्याच्या क्षणी विल्यमसनचा झेल सोडला आणि साऱ्यावर पाणी फेरलं.

loading image
go to top