Harsha Bhogle Team | T20 World Cup: हर्षा भोगलेंच्या संघात ३ पाकिस्तानी खेळाडू, पाहा टीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs PAK

भारताच्या किती क्रिकेटर्सना स्थान, पाहा Playing XI | Team of the Tournament

T20 WC: हर्षा भोगलेंच्या संघात ३ पाकिस्तानी खेळाडू, पाहा टीम

टी२० विश्वचषक २०२१ ही स्पर्धा नुकतीच संपली. न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने आपले पहिले टी२० विश्वचषक विजेतेपद मिळवले. डेव्हिड वॉर्नरच्या ५३ धावा आणि मिचेल मार्शच्या नाबाद ७७ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने १९ षटकांतच १७३ धावांचे आव्हान पार केले. स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला मालिकावीराचा सन्मान मिळाला. भारताचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर एक सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ निवडला. त्यात ३ पाकिस्तानी खेळाडूंचा त्यांनी समावेश केला.

हेही वाचा: "मी पुन्हा येईन"; धोनीचं हर्षा भोगलेंना दमदार उत्तर

Pakistan Cricket Team

Pakistan Cricket Team

साखळी फेरीतील सामन्यांच्या कामगिरीवर हर्षा भोगले यांनी हा संघ निवडला आहे. त्यात सलामीवीर म्हणून बाबर आझम आणि जोस बटलर हे दोन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. त्यापाठोपाठ तिसऱ्या जागेसाठी श्रीलंकेचा चरिथ असालांका आणि चौथ्या जागेसाठी आफ्रिकेचा ए़डन मार्क्रम यांना संधी देण्यात आली आहे. पाचव्या क्रमांकासाठी अनुभवी शोएब मलिक तर सहाव्या स्थानी मोईन अलीची निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय, श्रीलंकेचा स्पिनर हसरंगा यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी, ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड आणि आफ्रिकेचा एन्रीक नॉर्खिया यांना समाविष्ट करण्यात आले आहे.

Harsha Bhogle

Harsha Bhogle

हेही वाचा: ICC Most Valuable Team : बाबर कॅप्टन; टीम इंडियातील खेळाडूंची किंमत शून्य!

हर्षा भोगलेंनी निवडलेला संघ-

यष्टीरक्षक - जोस बटलर (इंग्लंड)

फलंदाज - बाबर आझम (पाकिस्तान), चरिथ असालांका (श्रीलंका), ए़डन मार्क्रम (द. आफ्रिका), शोएब मलिक (पाकिस्तान)

अष्टपैलू - मोईन अली (इंग्लंड), वनिंदु हसरंगा (श्रीलंका)

गोलंदाज - शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान), डेव्हिड वीसा (नामिबिया), जोश हेजलवूड (ऑस्ट्रेलिया), एन्रीक नॉर्खिया (दक्षिण आफ्रिका)

loading image
go to top