IPL 2021: "मी पुन्हा येईन"; धोनीचं हर्षा भोगलेंना दमदार उत्तर | MS Dhoni | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS-Dhoni-Harsha-Bhogle

पाहा, हर्षा भोगलेंनी काय विचारला होता प्रश्न...

"मी पुन्हा येईन"; धोनीचं हर्षा भोगलेंना दमदार उत्तर

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 FINAL मध्ये चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स संघावर २७ धावांनी विजय मिळवला आणि IPL विजेतेपदाचा चौकार लगावला. फाफ डू प्लेसिसच्या दमदार ८६ धावांच्या खेळीच्या जोरावर CSK ने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९२ धावांचा डोंगर उभारला. हे आव्हान KKR च्या फलंदाजांना पेलले नाही. सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५०) आणि शुबमन गिल (५१) यांनी संघाला दमदार सलामी मिळवून दिल्यानंतर इतर फलंदाजांनी मात्र पूर्णपणे निराशा केली. कोणताही फलंदाज जबाबदारीने न खेळल्यामुळे त्यांना २७ धावांनी पराभूत होऊन उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सामना संपल्यानंतर धोनीने पुढच्या वर्षीही खेळणार असल्याचे संकेत दिले.

हेही वाचा: IPL 2021: चेन्नईच 'सुपर किंग'; CSKचा विजेतेपदाचा चौकार!

"CSK बद्दल बोलायचं तर आम्ही आमच्या खेळाडूंमध्ये सतत बदल करत होतो. आमच्या संघाला रोज नवा मॅचविनर मिळायचा याचा मला अभिमान आहे. प्रत्येक फायनल ही खास असते. आम्ही सातत्यपूर्ण खेळी करणारा संघ आहोत. पण दुसऱ्या प्रकारे बघायचं झालं तर आम्ही फायनलमध्ये पोहोचून सातत्याने हारणारा संघही आहोत. बाद फेऱ्यांमध्ये पुनरागमन करणं हे महत्त्वाचं असतं. खूप चर्चा आणि भरपूर बैठका याने काहीही होत नाही. त्यापेक्षा थेट एकमेकांशी चर्चा करा, सराव सत्रात योग्य खेळ करा. सगळं नीट होईल. आम्ही याच पद्धतीने जिंकलो आहोत. त्यामुळे आम्हाला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे आभार", असं धोनी म्हणाला.

हेही वाचा: IPL FINAL: कार्तिकने डू प्लेसिसला दिलेलं जीवदान KKRला पडलं भारी

त्यानंतर हर्षा भोगले म्हणाले, "तू ज्या गोष्टी मागे सोडून चालला आहेस त्याचा युवा पिढीला खूप फायदा होईल. तुला नक्कीच याचा अभिमान आणि गर्व वाटत असेल, बरोबर ना?" त्यावर धोनीने झकास उत्तर दिलं. "मी अजूनपर्यंत काही मागे सोडलं नाहीये. मी पुन्हा येईन", असं धोनी म्हणाला आणि त्याच्या या वाक्याने समस्त क्रिकेटचाहते खुश झाले.

हेही वाचा: IPL FINAL Video: MS धोनीने कॅच घेण्यासाठी मारली उडी अन्...

"CSK बद्दल बोलण्याआधी मी KKR बद्दल बोलेन. ज्या परिस्थितीत त्यांचा संघ होता तेथून फायनल गाठणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे KKR देखील स्पर्धेचे विजेतेच आहेत असं मी मानतो. त्यांच्या कोच, संघ व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफचा हा एक उत्तम सांघिक प्रयत्न आहे. कोरोनामुळे मिळालेला ब्रेक त्यांना योग्य पद्धतीने वापरला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन", अशा शब्दात धोनीने KKR चे कौतुक केले.

loading image
go to top