...अन् हसन अलीची पत्नी माहेर घर असलेल्या भारतात परतण्याची पसरली अफवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 hassan ali with wife samiya arzoo
...अन् हसन अलीची पत्नी माहेर घर असलेल्या भारतात परतण्याची पसरली अफवा

...अन् हसन अलीची पत्नी माहेर घर असलेल्या भारतात परतण्याची पसरली अफवा

पाकिस्तान क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियन संघाने सेमी फायनलमध्ये पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे ग्रुप स्टेजमध्ये पाच पैकी पाच सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. पाकिस्तान संघाच्या पराभवाचे खापर हसन अलीच्या माथ्यावर फोडले जात आहे. हसन अलीने अखेरच्या षटकात मॅच विनिंग खेळी केलेल्या मॅथ्यू हेडनचा झेल सोडला होता. त्यामुळे हसन अलीला ट्रोल करण्यात आले. त्याच्यासोबतच त्याची भारतीय वंशाची पत्नीलाही लोकांनी लक्ष्य केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

पाकिस्तान संघाच्या पराभवानंतर हसन अलीला धमकीचे मॅसेज सुरु झाल्याचे वृत्त समोर आले होते. हसन अलीची पत्नी सामिया आरजू ही भारतीय आहे. या जोडीला एक मुलगी देखील आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर सामियासह मुलीलाही धमाकवण्यात येत आहे. त्यामुळे तिने पाकिस्तान सोडून आता भारतात परतण्याचे भाष्य केले आहे.

हेही वाचा: खान साब तुमची जिद्द नडली! पाक आउट झाल्यावर हे ट्वीट व्हायरल

सामिया हिचे एक ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे. काही निर्लज पाकिस्तानी चाहत्यांनी माझ्या मुलीलाही लक्ष्य केले. माझ्या मुलीला धमकावण्याचा प्रकार सुरु आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आमच्या सुरक्षेचं आश्वासन दिलं नाही तर मी भारतात असलेल्या आई-वडीलांकडे जाईन, अशा आशयाचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यावर आता सामियाने भाष्य केले आहे. हे वृत्त खोटे असल्याचे तिने म्हटले आहे. आम्ही सुरक्षित आहोत. माझ्या फेक अकाउंटवरुन अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.

हेही वाचा: भारतीय डॉक्टरने केला उपचार, रिझवानच्या रिकव्हरीची कहाणी थक्क करणारी

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने ग्रुप स्टेजमध्ये अपराजित कामगिरी केली होती. सेमी फायनलमध्येही त्यांचे पारडे जड मानले जात होते. मात्र मॅथ्यू हेडनने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियन संघाला विजय मिळवून दिला. 19 व्या षटकात बाबर आझमने हुकमी एक्का असलेल्या शाहीन शाह आफ्रिदीकडे चेंडू सोपवला. त्याच्या तिसऱ्या चेंडूवर मॅथ्यू हेडला बाद करण्याची संधी पाकिस्तानला मिळाली होती. मात्र हसन अलीने कॅच सोडला आणि पाकिस्तान संघाच्या हातून मॅच गेली.

loading image
go to top