टीम इंडियाच्या 'शायनर'ला शाहीन आफ्रिदीनं केलं जायबंदी

पाकिस्‍तान विरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिक पांड्याला स्कॅनसाठी रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली.
hardik pandya and shaheen afridi
hardik pandya and shaheen afridiSakal

ICC टी 20 वर्ल्‍ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेतील सलामीच्या लढतीत टीम इंडियाला पाकिस्तानने पराभवाचा धक्का दिला. भारतीय संघाने दिलेले आव्हान पाकिस्तान संघाने (India vs Pakistan) 10 विकेट राखून पार केले. वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतीय संघाला पाकिस्तानसमोर पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पाक विरुद्धच्या लढतीत हार्दिक पांड्या (Hardik Pandya Injury) दुखापतग्रस्त झाल्यामुळे विराट कोहली (Virat Kohli) च्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

पाकिस्‍तान विरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिक पांड्याला स्कॅनसाठी रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली. फलंदाजी करताना शाहीन आफ्रिदीचा चेंडू लागल्यानं त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे पांड्याला फिल्डिंगसाठी मैदानात उतरता आले नाही. त्याच्या जागी इशान किशन फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. पांड्याची दुखापत किती गंभीर आहे यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

hardik pandya and shaheen afridi
जगातील मुस्लिमांसह भारतातील मुसलमान पाकिस्तानी संघासोबत होते

हार्दिक पांड्याच्या उजव्या खांद्याला झाली दुखापत

बीसीसीआय (BCCI) ने दिलेल्या माहितीनुसार, पाक विरुद्ध फलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर स्कॅनसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पाकिस्तान विरुद्ध पांड्याने 11 धावांची खेळी केली होती. भारतीय संघ स्पर्धेतील पुढचा सामना 31 आक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाकडे खूप वेळ आहे. पांड्या फिट होऊन संघात परतणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

hardik pandya and shaheen afridi
Viral Video: पाकला पराभूत करण्याचे स्वप्न तुटले अन् मग भारतात TV सेट फुटले!

पाठिच्या दुखापतीपासून गोलंदाजीपासून दूर

पाठिच्या दुखापतीतून सावरणाऱ्या हार्दिक पांड्याला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फलंदाजीसाठी संघात स्थान मिळाले होते. पाठिच्या दुखापतीपासून तो गोलंदाजी करताना दिसत नाही. जर तो गोलंदाजी करणार नसेल तर प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेशच करु नये, अशा चर्चाही गेल्या काही सामन्यापूर्वी पाहायला मिळतात. पाकिस्तान विरुद्ध पांड्या टी-20 कारकिर्दीतील 50 वा सामना खेळला. पण या सामन्यात संधी असूनही त्याला शेवटपर्यंत मैदानात थांबता आले नाही. यात दुखापतीने आणखी एक धक्का त्याला आणि टीम इंडियाला बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com