Shoaib Akhtar : आपण डोकंच वापरलं नाही... शोएब रिझवानबद्दल हे काय बोलला?

T20 World Cup 2024 : शोएब अख्तरने पाकिस्तान संघाची लक्तरं टांगली वेशीवर, सांगितलं बॉल टू रन सामना कुठं हरला
Shoaib Akhtar
Shoaib Akhtar IND vs PAKesakal

IND vs PAK Shoaib Akhtar : भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव करत टी 20 वर्ल्डकपमध्ये आपला दुसरा विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करत भारताला 119 धावात ऑल आऊट केलं होतं. सामना पाकिस्तानच्या हातात होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पाकिस्तानला 20 षटकात 113 धावात रोखलं.

सामना हरल्यानंतर पाकिस्तान संघावर सर्व स्तरातून टीका होत आहे. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानी संघावर कडाडून टीका केली आहे. तो पाकिस्तानी संघाने आपलं डोकंच वापरलं नाही असं म्हणाला.

Shoaib Akhtar
Rohit Sharma : ... अन् रोहितनं हार्दिकला उचलूनच घेतलं! आयपीएलमधील दुरावा वर्ल्कपमध्ये संपला

शोएब अख्तर आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'आजच्या सामन्यानंतर अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. जिंकण्याची जिद्द, रणनितीची अंमलबजावणी... संघासाठी हे खूप निराशाजनक आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकायला हवा होता.'

'सामना त्यांच्या हातात होता. त्यांना 47 चेंडूत फक्त 46 धावा करायच्या होत्या. फखर जमान क्रिजवर होता. आपल्या हातात सात विकेट्स होत्या. मात्र आपण सामना जिंकू शकलो नाही. मला प्रचंड वेदना होत आहेत. काय बोलावं हेच सुचत नाही.'

Shoaib Akhtar
IND vs PAK : जरा चेक करा... NYPD ला टॅग करत दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानचा काढला चिमटा

शोएब आपल्या व्हिडिओत मोहम्मद रिझवानच्या इनिंगबद्दल देखील बोलला. शोएब म्हणाला. 'खूप निराशाजनक, पाकिस्तानसाठी हा सामना बॉल टू रन असा होता. भारताची मधली फळी ढेपाळली होती. ते 11 षटकात 80 धावांवर होते. त्यानंतर ते 160 धावांपर्यंत पोहचतील असं वाटत होतं.'

'पाकिस्तान विजयाचा खूप जवळ होता. मोहम्मद रिझावनने अजून 20 धावा केल्या असत्या तर संघ विजयच्या जवळ पोहचला होता. दुर्दैवाने आपण आपलं डोकंच चालवलं नाही.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com