T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेला सलग तिसऱ्या विजयाची आस! पहिल्यांदाच प्रतिस्पर्ध्यांना हरवण्यासाठी बांगलादेश सज्ज

South Africa vs Bangladesh 23rd Match T20 World Cup 2024 ­­: दक्षिण आफ्रिका-बांगलादेश यांच्यामध्ये आज (ता. १०) टी-२० विश्‍वकरंडकातील ड गटातील साखळी फेरीचा सामना रंगणार आहे.
South Africa vs Bangladesh 23rd Match T20 World Cup 2024
South Africa vs Bangladesh 23rd Match T20 World Cup 2024sakal

South Africa vs Bangladesh 23rd Match T20 World Cup 2024 ­­: दक्षिण आफ्रिका-बांगलादेश यांच्यामध्ये आज (ता. १०) टी-२० विश्‍वकरंडकातील ड गटातील साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. या गटातील ही अत्यंत महत्त्वाची लढत असणार असून दक्षिण आफ्रिकन संघ सलग तिसऱ्या विजयासह ‘सुपर एट’ फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहे. बांगलादेशच्या संघाने टी-२० प्रकारात दक्षिण आफ्रिकेला अद्याप एकदाही नमवलेले नाही. त्यामुळे त्यांचा संघ पहिल्यावहिल्या विजयासाठी जीवाचे रान करील.

South Africa vs Bangladesh 23rd Match T20 World Cup 2024
Ind Vs Pak T20 WC24 : बुमराह ठरला पाकिस्तानचा कर्दनकाळ! भारतानं 119 धावा डिफेंड करत पाकिस्तानचं केलं जवळपास पॅक अप

दक्षिण आफ्रिकन संघाने पहिल्या दोन लढतींत श्रीलंका व नेदरलँड्‌स यांना पराभूत केले, पण ७८ व १०४ धावांचे आव्हान परतवून लावताना दक्षिण आफ्रिकन फलंदाजांची भंबेरी उडाली. रीझा हेंड्रीक्स, क्विंटॉन डी कॉक, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन या स्टार फलंदाजांना अद्याप सूर गवसलेला नाही. डेव्हिड मिलरने नाबाद ५९ धावांची खेळी केली नसती, तर त्यांना नेदरलँड्‌सकडून पुन्हा एकदा पराभवाचा धक्का मिळाला असता. त्यामुळे आता बांगलादेशविरुद्धच्या लढतीत दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना सावध फलंदाजी करावी लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकन संघाने येथे दोन लढती खेळल्या आहेत. त्यामुळे येथील खेळपट्टी व वातावरणाचा कसा सामना करायचा याची माहिती त्यांना नक्कीच असावी. कागिसो रबाडा, मार्को यान्सेन, ॲनरिक नॉर्किया, ओटनील बार्टमॅन या वेगवान गोलंदाजांसह केशव महाराज हा एकमेव फिरकी गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकन संघात स्थान देण्यात येत आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीतही गोलंदाजी विभागात बदल होईल याची शक्यता कमी आहे.

South Africa vs Bangladesh 23rd Match T20 World Cup 2024
Jasprit Bumrah : रिझवानची दांडी अन् भारतानं भाकरी फिरवली; टीम इंडियाच्या विजयाची ही आहेत 5 कारणं

फलंदाजांनी कामगिरी उंचवावी

बांगलादेशने सलामीच्या लढतीत श्रीलंकेला पराभूत केले खरे, पण तरीही त्यांच्याही फलंदाजांकडून धावा करण्यात आलेल्या नाहीत. फलंदाजांचा सुमार फॉर्म त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरीत आहे. लिटन दासने समाधानकारक कामगिरी केली आहे. इतर फलंदाजांना मात्र कामगिरी उंचवावी लागणार आहे. शाकीब ऊल हसन याच्याकडून अष्टपैलू कामगिरीची आशा बाळगली जात आहे, पण त्याच्याकडून न फलंदाजी होत आहे न गोलंदाजी. ही बांगलादेशसाठी चिंतेची बाब होय. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्यासाठी बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांना अथक परिश्रम करावे लागणार आहेत.

ड गटातील सध्याची स्थिती

ड गटामध्ये सध्या दक्षिण आफ्रिकन संघ चार गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. बांगलादेशचा संघ दोन गुणांसह दुसऱ्या, तर नेदरलँड्‌सचा संघ दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. नेपाळ व श्रीलंका यांना अद्याप विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्यांना गुणांचे खाते उघडताच आलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com