T20 World Cup 2024 : पाकिस्ताननं ग्रुप स्टेजमधूनच गाशा गुंडाळल्यानं आयसीसीला होणार मोठं नुकसान?

Pakistan Cricket Team : पाकिस्तान संघाने वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळल्यामुळं आयसीसी आणि ब्रॉडकास्टर्स यांना चांगलाच धक्का बसला आहे.
Pakistan Cricket Team
T20 World Cup 2024 Pakistanesakal

T20 World Cup 2024 Pakistan : पाकिस्तानचा संघ हा जागतिक क्रिकेट वर्तुळातील एक महत्वाचा संघ आहे. गेल्या काही वर्षापासून त्यांची कामगिरी थोडी खालावली आहे. यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील त्यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. युएसएकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला अन् आता त्यांचे वर्ल्डकपमधील आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात आलं आहे.

युएसए आणि आयर्लंड सामना पावासमुळे रद्द झाला अन् दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाले. यामुळे युएसएचे 5 गुण झाले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचा ग्रुप स्टेजमधील एक सामना शिल्लक आहे. जरी त्यांनी आयर्लंडविरूद्धचा सामना जिंकला तरी त्यांचे 4 गुण होतात. त्यामुळे 5 गुण असलेली युएसए सुपर 8 साठी पात्र झाली आहे.

Pakistan Cricket Team
IND vs CAN Weather Updates : भारत 'सराव' सामन्याविनाच सुपर 8 गाठणार; फ्लोरिडात टीम इंडिया पॅव्हेलियनमध्येच बसणार?

पाकिस्तानचा भारत, युएसएविरूद्ध पराभव झाला. त्यानंतर पावसामुळं त्यांचे सुपर 8 मध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळालं. पाकिस्तानने टी 20 वर्ल्डकप मधून लवकर एक्झिट घेण्याने पाकिस्तानचे चाहते नाराज झाले आहे. याचबरोबर पाकिस्तानची एक्झिट ही आयसीसी आणि सामन्याचे प्रसारण करणाऱ्या वाहिन्यांना देखील झटका देणारी ठरणार आहे.

पाकिस्तान हा चांगला फॅन बेस असलेला संघ आहे. तो जर स्पर्धेत जास्त काळ टिकला तर आयसीसी आणि ब्रॉडकास्टर्सना चांगला फायदा होतो. सुपर 8 मध्ये पाकिस्तान असता तर त्यांचा मोठमोठ्या संघांसोबत सामना झाला असता. याचबरोबर भारत - पाकिस्तान सेमी फायनल सामना देखील झाला असता. या सामन्यात ब्रॉडकास्टर्सनी चांगली कमाई केली असती.

Pakistan Cricket Team
Shubman Gill : गिलनं रोहितला केलं अनफॉलो; शुभमनसह आवेश खान मायदेशात परतणार, टीम इंडियात चाललंय तरी काय?

स्टेडियम पूर्ण क्षमतेने भरले असते त्यामुळे आयसीसीचा देखील चांगला फायदा झाला असता. पाकिस्तान सुपर 8 मध्ये पोहचू न शकल्यानं आयसीसी आणि ब्रॉडकास्टर्सचे मोठे नुकसान झालं आहे. त्यात आता पावसामुळे ग्रुप A मधील काही सामने तसेच इतर सामने देखील रद्द करावे लागल्यामुळे देखील आयसीसी आणि ब्रॉडकास्टर्सला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com