T20 World Cup: विंडिजविरुद्ध PNG च्या सेसे बाऊचं विक्रमी अर्धशतक, तर रसेलचा IPL नंतर वर्ल्ड कपमध्येही गोलंदाजीत जलवा

WI vs PNG: टी20 वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यात पीएनजीच्या सेसे बाऊ आणि वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलने मोठे विक्रम केले आहेत.
Sese Bau | Andre Russell
Sese Bau | Andre Russell Sakal

T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला रविवारी (2 जून) सुरुवात झाली. स्पर्धेतील दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यु गिनी संघात झाला. गयाना येथे झालेल्या या सामन्यात पीएनजीच्या सेसे बाऊ आणि वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलने मोठे विक्रम केले आहेत.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत पीएनजीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी पीएनजीच्या अनेक फलंदाजांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. मात्र, एकीकडे विकेट्स जात असताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या सेसे बाऊने अर्धशतक झळकावले. त्याने 43 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारांसह 50 धावांची खेळी केली.

त्यामुळे तो टी20 वर्ल्ड कपमध्ये अर्धशतक करणारा पीएनजीचा पहिलाच खेळाडू ठरला. तसेच आयसीसीचे सहसदस्य संघाच्या खेळाडूने वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20मध्ये अर्धशतक करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2022 मध्ये स्कॉटलंडच्या जॉर्ज मुन्सीने नाबाद 66 धावांची खेळी केली होती.

Sese Bau | Andre Russell
T20 World Cup: वर्ल्ड कप मोहिम सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला टेन्शन, द्रविडने व्यक्त केली दुखापतीची भीती

आंद्रे रसेलचाही विक्रम

या सामन्यात वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेलने 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 51 विकेट्स पूर्ण केल्या. तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 50 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा वेस्ट इंडिजचा सहावा गोलंदाज ठरला आहे.

वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक टी20 विकेट्स घेणारे गोलंदाज

  • 78 - ड्वेन ब्रावो

  • 66 - जेसन होल्डर

  • 54 - सॅम्युअल बद्री

  • 52 - सुनील नारायण

  • 52 - शेल्टन कॉट्रेल

  • 51 - आंद्रे रसेल

Sese Bau | Andre Russell
T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

पीएनजीचे वेस्ट इंडिजसमोर 137 धावांचे लक्ष्य

या सामन्यात पीएनजीकडून सेसे बाऊव्यतिरिक्त किप्लिन डोरिगाने 18 चेंडूत 27 धावांची खेळी केली, तर कर्णधार असाद वालाने 21 धावा केल्या. त्यामुळे पीएनजीने 20 षटकात 8 बाद 136 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजसमोर 137 धावांचे लक्ष्य ठेवले.

वेस्ट इंडिजकडून रसेल व्यतिरिक्त अल्झारी जोसेफनेही 2 विकेट्स घेतल्या. अकील हुसेन, रोमरिओ शेफर्ड आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com