USA Vs CAN : टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात षटकार चौकारांचा पाऊस! यजमान अमेरिकेने चारली कॅनडाला पराभवाची धूळ

USA beat Canada T20 World Cup 2024 : यजमान अमेरिकेने आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. अँड्र्यू गॉस आणि ॲरॉन जोन्स या जोडीने तुफानी फलंदाजी करत कॅनडाच्या गोलंदाजांना सळोकी पळो करून सोडले.
USA beat Canada T20 World Cup 2024 Marathi News
USA beat Canada T20 World Cup 2024 Marathi Newssakal

United States Vs Canada T20 World Cup 2024 : यजमान अमेरिकेने आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. अँड्र्यू गॉस आणि ॲरॉन जोन्स या जोडीने तुफानी फलंदाजी करत कॅनडाच्या गोलंदाजांना सळोकी पळो करून सोडले. सह-यजमान अमेरिकेने आसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या पहिल्या सामन्यात कॅनडाचा सात गडी राखून पराभव करून विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली.

प्रथम फलंदाजी करताना नवनीत धालीवाल आणि निकोलस किर्टन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कॅनडाने 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 194 धावा केल्या, पण प्रत्युत्तरात अमेरिकेने 17.4 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 197 धावा करत विजयाची नोंद केली.

USA beat Canada T20 World Cup 2024 Marathi News
Hardik Pandya : 6,6,6... जलवा है हमारा! मुंबईच्या चाहत्यांची हार्दिक पांड्याने केली बोलती बंद; ठोकल्या इतक्या धावा

अमेरिकेकडून ॲरॉन जोन्सने दमदार फलंदाजी करत 40 चेंडूत 4 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा केल्या. ॲरॉनने अँड्रिससोबत तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. अँड्रिसनेही 46 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या आणि अमेरिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

USA beat Canada T20 World Cup 2024 Marathi News
T20 World Cup 2024 : टीम इंडियाच्या कॉम्बिनेशन बदललं... जैस्वालची सुट्टी तर 'हा' खेळाडू करणार रोहितसोबत ओपन?

अमेरिका आणि कॅनडा यांच्यात झालेल्या अ गटातील सामन्यात यजमान संघाचा कर्णधार मोनांक पटेल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नवनीत आणि निकोलस यांनी शानदार खेळी करत कॅनडाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. नवनीतने 44 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या तर निकोलसने 31 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज श्रेयस मोवाने 16 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 32 धावा करून नाबाद माघारी परतला.

USA beat Canada T20 World Cup 2024 Marathi News
टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघाला मोठा धक्का! Ind vs Ban मॅचदरम्यान स्टार खेळाडू जखमी, हाताला पडले ६ टाके

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अमेरिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाने 42 धावांवर दोन गडी गमावले. यानंतर अँड्रिस आणि ॲरॉनने मिळून डाव सांभाळला आणि दमदार फलंदाजी केली. आरोनने केवळ 22 चेंडूत अर्धशतक केले, जे अमेरिकेसाठी टी-20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे.

ॲरॉन आणि आंद्रेस यांनी तुफानी फलंदाजी करत अमेरिकेला संकटातून बाहेर काढले आणि कॅनडाच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. अर्धशतक झळकावल्यानंतर आंद्रेस बाद झाला तरीही ॲरॉनने आपली झंझावाती खेळी सुरूच ठेवत संघाला विजयाकडे नेत नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com